Download App

Ahmednagar Crime : एजंट्सची अरेरावी वाढली, सही केली नाही म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला…

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहनासंबंधी काही एक कामे असल्यास आपल्याला आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र आरटीओ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सही दिली नाही. म्हणून एका एजंटने आरटीओच्या कर्मचाऱ्यावर थेट हल्लाच चढवला. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंट लोकांची मुजोरी पहायला मिळाली.

नेमकं काय घडलं ?

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात 23 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कामकाज सुरू असताना एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ यूनुस जमादार यानं वाहनावरील बोजा कमी करत, वाहन हस्तांतरन करण्याचं काम करून दे, असं आरटीओ कर्मचारी सुनील जगन्नाथ शेवरे यांना सांगितले.

चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी Aditi Rao Hydari अनोख्या सन्मानाने सन्मानित

तसेच ‘मी कोण आहे? तुला माहीत नाही. थांब तुला दाखवतो’. म्हणत अरेरावी व शिवीगाळ केला. त्यानंतर कर्मचाऱ्याने सही न केल्याने संतापल्या एजंटने थेट संबंधित कर्मचाऱ्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्याला मारहाण करत चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. धारदार लोखंडी हत्यार व 14 ते 15 लोकांसोबत, आरटीओ कार्यालयातील केबिन मध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवून कर्मचा-यास मारहाण केली.

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचा ते चत्मकार करू शकतात; बच्चू कडूंचा जानकरांना खोचक टोला

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी सुनील जगन्नाथ शेवरे यांच्या फिर्यादीवरून, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सूचनेनुसार गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस बाकी आरोपींचा शोध घेत आहेत.

https://youtu.be/WGXttRYwSoE?si=a7-J1INZerDJjYBd

Tags

follow us