Ahmednagar Crime : स्टेट्स ठेवत पतीने घेतला गळफास… मृत्यूचे कारण ऐकून व्हाल हैराण

Ahmednagar Crime : स्टेट्स ठेवत पतीने घेतला गळफास… मृत्यूचे कारण ऐकून व्हाल हैराण

Ahmednagar Crime : तणाव, वाद यातून अनेकदा नैराश्यग्रस्त झालेल्या व्यक्ती थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या असतील. त्यात आता एकाने व्हॉटसअपवर स्टेट्स ठेवता गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आत्महत्येचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीच्या सासरवाडीचे लोक त्याला त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी धमकी देत होते. तिचा नाद सोडून दे, नाहीतर तुझा मर्डर करू अशा धमक्या येत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Ahmednagar Crime Husband Suicide by updating status on What’s app )

धुळ्यात डिझेलचा ट्रक उलटला, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांची डिझेल लुटायला झुंबड

हरिश्चंद्र राजेंद्र जाधव (रा. नायगाव, ता. जामखेड) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. दरम्यान ही घटना जामखेड तालुक्यातील नायगाव याठीकाणी घडली आहे. याप्रकरणी संबंधित मुलाचे चुलते पोपट जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीवरून युवकाच्या सासरवाडी कडील सविता कैलास जाधव, कैलास जाधव, विलास कैलास जाधव, बालाजी कैलास जाधव, लताबाई कैलास जाधव व कविता गणेश किलमिस (सर्व रा. दौंडाचीवाडी ता. जामखेड) अशा सहा जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 जुलैपर्यंत दोन हजारांच्या 88 टक्के नोटा बँकांमध्ये जमा; नोटा बदलीसाठी दोन महिने…

याबाबत अधिक माहिती अशी, हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व त्याची पत्नी सविता कैलास जाधव यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्नापूर्वीच त्यांना एक मुलगा झाला. हे सासरवाडीच्या सर्व लोकांना माहीत होते. मात्र तरीही त्या दोघांचे लग्न लावून देण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे अखेर या जोडप्याने थेट आळंदी गाठत तेथे जाऊन विवाह केला.

हीच गोष्ट मुलीच्या नातेवाईकांना खटकली. त्यामुळे वाद होत होते. यातून 29 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता नायगाव येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन हरिश्चंद्र याने आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येपूर्वी हरिश्चंद्र याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube