Download App

गुन्हेगारांवर लक्ष ठेवणार प्रशासनाचा ‘तिसरा डोळा’; सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरु

Ahmednagar : नगर शहरात होत असलेल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच शहरात काय घडत आहे याची माहिती मिळावी यासाठी आता पोलीस प्रशासनाचा तिसरा डोळा कार्यरत असणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर’ची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी होणार रिलीज

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.

100 पेक्षा अधिक झटके, मेंदुचा रक्तपुरवठा बंद; बलून अ‍ॅंजिओप्लास्टीमुळे 34 वर्षीय रुग्णाला जीवदान

यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा शहरामध्ये कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी होती ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 51 चौकांमध्ये 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन 200 कॅमेरे बसविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या यंत्रणेमुळे शहरांतर्गत व शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला यामुळे आळा घालता येणार आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार पळून जातात.

अशावेळी या कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांच्या वाहनांचा क्रमांक तसेच त्यांचे चेहरे ओळखता येणे शक्य होणार आहे. या यंत्रणेबरोबरच उद्घोषणा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून नागरिकांना सुचना देणेही यामुळे शक्य होणार असल्याचे मंत्री विखे यावेळी म्हणाले.

Tags

follow us