100 पेक्षा अधिक झटके, मेंदुचा रक्तपुरवठा बंद; बलून अ‍ॅंजिओप्लास्टीमुळे 34 वर्षीय रुग्णाला जीवदान

100 पेक्षा अधिक झटके, मेंदुचा रक्तपुरवठा बंद; बलून अ‍ॅंजिओप्लास्टीमुळे 34 वर्षीय रुग्णाला जीवदान

कर्नाटकातील बंगळुरुमधील एका 34 वर्षीय रुग्णाला बलून अ‍ॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळालं आहे. बंगळुरुमधील केंगेरीस्थित 34 वर्षीय रोहनला मागील एक महिन्यापासून 100 पेक्षा अधिक झटक्यांना सामोरं जावं लागलं होतं. रोहनला दररोज 100 पेक्षा अधिक झटके येत असल्याने रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे डॉक्टरांना उपचार करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अखेर बलून
अ‍ॅंजिओप्लास्टी आणि आधुनिक तंत्राचा वापर करुन शस्त्रक्रिया केल्याने रोहनला जीवदान मिळालं आहे.

राज ठाकरेंना भाजपाची ऑफर; अजितदादा म्हणाले, मला असलं काही…

फोकल सेरेब्रल आर्टिरिओपॅथीमुळे रोहनला झटके येण्याचा त्रास होता, या झटक्यांमुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह जवळजवळ पूर्णत: बंद झाला होता. मागील एका महिन्यापेक्षा अधिक दिवसांपासून त्याला दिवसातून तीन ते सहा वेळा सौम्य झटके येत असतं. या झटक्यांमुळे त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये अशक्तपणा येत होता.

NIA RAIDS :राज्यात चार ठिकाणी एनआयएची छापेमारी ! कोल्हापूरातून तिघे ताब्यात, कागदपत्रे हाती

रोहनच्या एका रक्तवाहिनीत जळजळ होत असल्याने मेंदूला होणार रक्तप्रवाह कमी प्रमाणात सुरु होता. त्यामुळे अशा रुग्णांना रक्त पातळ करणारे औषध घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. दरम्यान, रोहनलाही या औषधांचे उपचार सुरु होते पण रोहन तो कोणत्याही औषधांना, इंजेक्शनला प्रतिसाद देत नव्हता. त्याला रोज अनेक झटके येतच होते. रोहनला झटक्यांमुळे त्याच्या मेंदुला हानी झाल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, बलून अ‍ॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्यानंतर आता रोहनला तब्येतील सुधारणा झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या मेंदुला रक्तपुरवठा होण्यास मदत होत आहे. 25 मे रोजी रोहनला बेंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका आठवड्यानंतर रोहनला स्टेंटिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या रक्तवाहिन्या फुटण्याची भीती डॉक्टरांना वाटत असल्याने ते धोकादायक वाटत होते. अखेर डॉक्टरांनी बलून अॅंजिओप्लास्टी केल्यानंतर रोहनच्या लक्षणांमध्ये घट झाली आहे.

bengaluru rohan suffers tias more-than-100-strokes-drug-coated-balloon-saves-life-8580334.html

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube