Ahmednagar Crime : अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. ओंकार पांडुरंग भागानगरे ऊर्फ गामा (24) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शुभम पडाेळे हा गंभीर जखमी झाली आहे. शहरातील बालिकाश्रम रोडवर सोमवारी (19 जून) मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी ओंकार रमेश घोलप (वय 26, रा. माणिक चौक, अहमदनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून ताेफखाना पाेलिस ठाण्यात गणेश केरुप्पा हुचे, नंदू बाेराटे आणि संदीप गुडा या तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
TMKOC निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, नेमके काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी, मयत भागानगरे आणि त्याचे मित्र त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करीत होते. वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर ओंकार घाेलप, मयत ओंकार ऊर्फ गामा, शुभम पडाेळे, आदित्य खरमाळे हे जाधव मळ्यातील रस्त्याकडेच्या बाकावर बसले हाेते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी पिशवीतून तलवार काढत “आज तुम्हाला जिवंत सोडत नाही” म्हणत भागानगरे याच्या हातावर आणि पोटावर पहिला वार केला.
हल्ला होताच बचावासाठी ओंकार तेथून पळला आणि बालिकाश्रम राेडवर जाऊन खाली पडला. त्याचवेळी नंदू बाेराटे आणि संदीप गुडा हे फिर्यादी ओंकार घाेलप, शुभम पडाेळे आणि आदित्य खरमाळे याच्या मागे तलवार घेऊन धावले. यात शुभम पडाेळे याच्यावर वार झाल्याने ताेही गंभीर जखमी झाला. ओंकार घाेलप आणि आदित्य खरमाळे हे अंधारात लपून राहिल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर गणेश हुच्चे आणि त्याचे दाेन्ही साथादीर दुचाकीवरून निघून गेले.
यानंतर बालिकाश्रम रोडवर पडलेल्या ओंकार भागानगरे याला उठविण्यासाठी राहुल रोहकले हा युवक धावला. त्यावेळी गणेश हुच्चे आणि संदिप गुडा हे तिथे आले. गणेश हुच्चेने गाडीवरुन खाली उतरत खाली पडलेल्या ओंकारवर सपासप वार केले. गाडीवर पुन्हा जात असताना त्याने सिनेस्टाईल तलवार जमिनीवर घासत शिवीगाळ करत निघून गेला. घडत असलेला प्रकार पाहून सोबतचे सर्वच मित्रही घाबरुन गेले.
मित्र आणि नातेवाईंकांनी ओंकार भागानगरे व पडोळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत भागानगरे याचा मृत्यू झाला होता. तर शुभम पडोळे जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) याच्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ram Charan: लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरण अन् उपासना झाले आई-बाबा, घरी गोंडस मुलीचे आगमन
गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे याने पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याच्या तक्रारीवरून काेतवाली पाेलिसांनी गणेश हुच्चेच्या अवैध धंद्यांवर छापेमारी केली होती.कारवाईवेळी फिर्यादी ओंकार, मयत ओंकार ऊर्फ गामा आणि त्याचे मित्र काेतवाली पाेलिस ठाण्यात हाेते. त्यावेळी गणेश हुच्चे हा तिथे आला आणि “तुम्ही चांगले केले नाही. तुमच्याकडे पाहून घेताे”, असा दम देत निघून गेला. यानंतर मध्यरात्री गणेश हुच्चे, नंदू बाेराटे आणि संदीप गुडा या तिघांनी बालिकाश्रम राेडवरील जाधव मळ्यात फिर्यादी ओंकार आणि ओंकार ऊर्फ गामा यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला.