Download App

अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया यांची फेरनिवड

Ahmednagar News : अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची वार्षिक (Ahmednagar) सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सभेत अहमदनगर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया यांची फेरनिवड करण्यात आली. शहरातील हॉटेल आयरिस प्रीमियर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.

नवीन कार्यकारिणीची निवड हा सभेसमोरचा मु्ख्य विषय होता. या सभेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, जोगासिंग मिनहास, अमरजितसिंग साही, मानद सचिव रोनप (रॉनी) फर्नांडिस, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, प्रदीपकुमार जाधव, गोपीचंद परदेशी, मानद खजिनदार रिशपालसिंग परमार, उपखजिनदार रणबीरसिंग परमार, कार्यकारिणी सदस्य- पल्लवी सैंदाणे, रमेश परदेशी, सादीक सय्यद, राजू पाटोळे, जोएब खान, जेव्हिअर स्वामी, अरविंद कुडिया, सॅवियो वेगास आणि गोपाल मनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘या’ ठिकाणी होणार आणखी एक उड्डाणपूल

Tags

follow us