अहमदनगर जिल्हा नामांतराचा मुद्दा अधिवेशनात! शिंदे-फडणवीसांनी घोषणा केली पण पुढे…

Ahmednagar : राज्यातील (Maharashtra)औरंगाबाद (Aurangabad)व उस्मानाबाद (Osmanabad)या दोन जिल्ह्यांची नामांतर झाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय देखील समोर आला. जिल्ह्याचे नामांतर करून ते अहिल्यानगर अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी जामखेड (Jamkhed) तालुक्यातील चौंडी (Chaundi)येथे केली होती. मात्र घोषणा करून झाली मात्र नामांतराचा विषय तसाच प्रलंबित राहिला, […]

Ram Shinde Ahmednagar

Ram Shinde Ahmednagar

Ahmednagar : राज्यातील (Maharashtra)औरंगाबाद (Aurangabad)व उस्मानाबाद (Osmanabad)या दोन जिल्ह्यांची नामांतर झाले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय देखील समोर आला. जिल्ह्याचे नामांतर करून ते अहिल्यानगर अशी घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी जामखेड (Jamkhed) तालुक्यातील चौंडी (Chaundi)येथे केली होती. मात्र घोषणा करून झाली मात्र नामांतराचा विषय तसाच प्रलंबित राहिला, यामुळे यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram shinde)यांनी विधानपरिषदेत केली.

Government Schemes : कुसुम सोलर पंप योजना आहे तरी काय? लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार राम शिंदे यांनी अहिल्यादेवीच्या जन्मगावी चौंडी येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंचावरच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे घोषित केले होते.

Winter Session : प्रिया सिंगप्रकरणी प्रणिती शिंदेंचे भाजपाला खडेबोल; नितेश राणेंचंही प्रत्युत्तर

त्यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरचे नाव अहिल्यानगर केले मात्र अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. जनतेमध्ये नाराजी पसरली असून चौंडीत मुख्यमंत्र्यांनी नामांतराची केवळ घोषणाबाजी केली मात्र बजावणी अद्याप झाली नसल्याने तातडीने याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबितच
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा असलेला अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे तिला विभाजन व्हावी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. यावर अनेकदा आंदोलन झाली. सरकारदरबारी कागदपत्रे देखील सादर झाली मात्र यावरती अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतर व जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागणार का? नगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version