Winter Session : प्रिया सिंगप्रकरणी प्रणिती शिंदेंचे भाजपाला खडेबोल; नितेश राणेंचंही प्रत्युत्तर

Winter Session : प्रिया सिंगप्रकरणी प्रणिती शिंदेंचे भाजपाला खडेबोल; नितेश राणेंचंही प्रत्युत्तर

Winter Session : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (Winter Session) काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार वाद पाहण्यास मिळाले. मुद्दा होता ठाण्यातील प्रिया सिंग आणि अश्वजित गायकवाड प्रकरणाचा. आ. शिंदे यांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरत भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे संतापलेल्या नितेश राणे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करत आमदार प्रणिती शिंदे यांनी विचारलेली माहिती रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर सभापतींनी औचित्याचाच मुद्द्याचे कामकाज रेकॉर्डवर घेतले जाईल, असे स्पष्ट केले.

आमदार शिंदे म्हणाल्या, मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एमएसआरडीसीच्या एमडींचे चिरंजीवही आहेत. ह्यांनी एका महिलेला गाडीने फरफटत नेलं. तरी देखील त्या महिलेचं स्टेटमेंट घेण्यात आलं नाही. तिने तक्रार दिली होती पण त्या तक्रारीचीही नोंद घेतली गेली नाही. या कारणामुळे काल अश्वजित गायकवाडला जामीन मिळाला. महिलेला गाडीने फरफटत नेलं तरी देखील संबंधितांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत नाही. महिलांवर जर असा अत्याचार आपल्या राज्यात होत असेल तिचा जबाबही घेतला जात नसेल तर शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. चौकशी करावी अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.

‘अश्वजीत’चा भाजपशी कोणताही संबंध नाही; आरोपांवर चित्रा वाघ यांनी सुनावलं

त्यावर आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत. अशी पॉइंट ऑफ इन्फर्मेशन कधीही विचारता येत नाही. त्यामुळे हे रेकॉर्डवरून काढून टाका. जेव्हा आपण संधी द्याल तेव्हाच त्या माहिती विचारू शकतात. कुणीही कधीही काहीही विचारू शकतो का? असा सवाल उपस्थित करत आमदार नितेश राणे यांनी ही माहिती रेकॉर्डवरून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी हस्तक्षेप करत त्यांचा औचित्याचाच मुद्दा आहे. त्यामुळे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल बाकी येणार नाही. यानंतर शिंदे म्हणाल्या, तुम्ही मी विचारलेली माहिती रेकॉर्डवरून काढू शकत नाही.

नेमकं काय घडलं होतं?
प्रिया सिंगच्या माहितीनूसार, अश्वजीत गायकवाडने फोन केल्यानंतर 11 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घोडबंदर रोडवरील एका हॉटेलजवळ कौटुंबिक कार्यक्रमात भेटायला गेले. पण माझ्या लक्षात आले की तो विचित्र वागत आहे आणि एकांतात बोलण्याची मागणी करत आहे.

पण मी नकार दिल्यानंतर त्याने मला थप्पड मारली, माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझ्यावर हात उचलला, मला मारहाण केली, माझे केस ओढले. तेव्हा त्याच्या मित्राने मला जमिनीवर ढकलले, फोन आणि बॅग घेण्यासाठी मी माझ्या कारकडे धावली आणि तेव्हाच अश्वजीतने त्याच्या ड्रायव्हरला गाडी चालविण्यास सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube