Winter Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन नाही तर, फोटोसेशन गाजलं; पाहा फोटो

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. यावेळी आमदार आणि मंत्र्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला

कारण ज्या विधिमंडळामध्ये सत्ताधाी आणि विरोधकांमध्ये तूतू मैंमैं होतं असते. त्याएवजी आज 14 डिसेंबरला वेगळंच चित्र पाहायाला मिळालं आहे.

आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन, घोषणाबाजी विरोध दिवस नव्हता तर सत्ताधारी विरोधकांनी एकत्र येत हास्यविनोद करत फोटोसेशन केलं.

या फोटोसेशनमध्ये सर्वपक्षाचे आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांनी यावेळी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे राजटकीय मंडळी एकमेकांना टाळ्यादेत गप्पा मारताना, मिठ्या मारताना दिसले.

तसेच यावेळी महिला आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढला.
