Kopargaon News : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्यावतीने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव (Navratri 2024) साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली. मंडळातर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवात हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजपासून सुरू होणारा नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, दांडिया स्पर्धा अनेक नवीन स्पर्धा व उपक्रमांबरोबरच सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव, कौन बनेगी कोपरगाव स्मार्ट सखी, महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी योग व दांडिया प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या देवीच्या विविध दागिन्यांची स्पर्धा, नवरात्रीच्या नऊ दिवस कुंकुमार्चन, देवीचे पाठ, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाबरोबरच अनेक स्पर्धांमध्ये महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
बसस्थानक व्यापारी संकुल लवकरच व्यावसायिकांसाठी उपलब्ध होईल; आमदार आशुतोष काळे
यामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या विजेत्यांना पहिले बक्षीस फ्रीज, दुसरे मायक्रो ओव्हन, तिसरे गॅस शेगडी, चौथे पंखा, पाचवे डिनर सेट, दांडिया स्पर्धा लहान गटासाठी पहिले बक्षीस ३१,०००/- दुसरे २५,०००/-,तिसरे २०,०००/-, चौथे १०,०००/-, प्रथम उत्तेजनार्थ ५,०००/- द्वितीय उत्तेजनार्थ ५,०००/- तसेच दांडिया स्पर्धा खुल्या गटासाठी पहिले बक्षीस ४१,०००/- दुसरे ३१,०००/-,तिसरे २१,०००/-, चौथे ११,०००/-प्रथम उत्तेजनार्थ ५,०००/- द्वितीय उत्तेजनार्थ ५,०००/-, सिंगिंग स्टार ऑफ या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस कराओके बॉक्स, दुसरे मिनी कराओके बॉक्स, तिसरे ऑडीओ मिक्सर, चौथे ट्रॉफी, महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांसाठी रोख स्वरुपात बक्षिसे ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस १५,०००/- दुसरे १०,०००/-,तिसरे ७,०००/-,चौथे ५,०००/- व पाचवे ३,०००/- अशी विविध बक्षिसे मिळणार आहेत. या विविध उपक्रमांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले आहे.
मागील वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त नाशिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका वणी गडावरून कोपरगावमध्ये आणल्या होत्या. त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदारसंघातील विविध गावातील भक्तांना दर्शनाचा लाभ मिळाला होता. याहीवर्षी वणी गडावरून देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पादुका गुरुवारी कोपरगाव शहरात येणार आहेत या पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी या पादुका कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. या भक्तीमय सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पु्ष्पाताई काळेंनी केले आहे.
आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीसाठी 19.63 कोटींची मंजुरी