आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीसाठी 19.63 कोटींची मंजुरी

आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीसाठी 19.63 कोटींची मंजुरी

MLA Aashutosh kale News : कोपरगाव मतदारसंघात गोदावरी नदीवरील कोल्हापुर टाईप बंधाऱे, केटीवेअर संरक्षक भिंतींच्या दुरुस्तीसाठी 19.63 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालीयं. मागील अनेक दिवसांपासून आमदार आशुतोष काळे (MLA Aashutosh kale) यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी काळेंकडून पाठपुरावाही सुरु होता. अखेर बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीसाठी शासनाकडून निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार काळे यांनी दिलीयं. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं काम मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी काळे यांचे आभार मानले आहेत.

Raveena Tandon: भूल भुलैया-3 आणि सिंघम अगेनचे क्लॅश: अभिनेत्रीच्या पतीने बनवला मास्टर प्लॅन

कोपरगावात सिंचनासाठी पाण्याची निर्मीती करण्यासाठी गोदावरी नदीवर कोल्हापुर टाईप बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या बंधाऱ्यात पासवाळ्यात नदीला वाहून जाणारे पाणी अडवून नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा फायदा होता. मात्र, या बंधाऱ्याचे पक्के बांधकाम गरजेचं असल्याने शेतकऱ्यांकडून बांधकामासाठी सातत्याने मागणी केली जात होती. या कामासाठी आमदार काळे यांनी वेळोवेळी आवाज उठवला, अखेर बंधाऱ्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर झालायं.

रविवारी निर्णय जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं

आशुतोष काळेंच्या प्रयत्नामुळे राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत केटीवेअरच्या दोन्ही बाजूच्या भिंती, हिंगणी केटीवेअरच्या भिंती, शिंगेव व पुणतांबा केटीवेअरच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी एकूण 19.63 कोटी रुपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता देण्यात आलीयं. शासनाने दखल घेत मागणी पूर्ण केल्याने आमदार काळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले तर शेतकऱ्यांनीही काळे यांचे आभार मानले आहेत.

शेअर बाजाराची आज तेजीसह सुरुवात; निफ्टी 80 अंकांनी वधारला, तर सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला

आशुतोष काळेंच्या दुरदृष्टीची साक्ष…
गोदावरी नदीवर बांधलेले कोल्हापुर टाईप बंधारे शेतीसाठी वरदान ठरले आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावे गालणार होते. त्यामुळे मंजुरीच्या दुरुस्तीसाठी आमदार काळे यांनी 41.46 निधी आणला. त्यामुळे लवकरच या मंजूर बंधाऱ्याचे काम सुरु होणार असून केटीवेअरचीही अशी अवस्था होऊ नये, यासाठी आशुतोष काळेंनी मंजूर केलेला 19.63 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या दुरदृष्टीची साक्षच देत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube