रविवारी निर्णय जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं

रविवारी निर्णय जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी स्थापन होणार आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत मोठा निर्णय जाहीर  करू अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे उद्या आदिवासी समाज सत्तासंपन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. आपल्याकडून निवडणुकीबाबत काय तयारी सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले, आम्ही आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन एक आघाडी उभी करत आहोत. या आघाडीचं नामांतर आम्ही येत्या 6 ऑक्टोबरला जाहीर करू. भाजप सोडून ज्यांना कुणाला आघाडीत यायचं असेल ते येऊ शकतात. पण आम्ही मात्र कुणाकडेच जाणार नाही.

“..तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

आम्ही निवडणुकीची स्वतंत्र तयारी केली आहे. काल चोपड्याला एक परिषद आयोजित करण्यात आली होती. उद्या मनमाडमध्ये परिषद होणार आहे. या परिषदेच्या तयारीसाठी आज मी नाशिकमध्ये आलो आहे. येत्या सहा तारखेला नागपुरात आदिवासींची सत्तासंपन्न परिषद घेतली आहे. राज्यातला आदिवासी समाज आणि विविध संघटना यांना आम्ही एकत्र करत आहोत. आदिवासी संघटन आणि ओबीसी संघटन यांना एकत्रित करून आम्ही निवडणूक लढत आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

ओबीसी नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र

शरद पवार यांनी चार पाच दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत एकाही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही. ओबीसी आता एकांगी पडला आहे अशी परिस्थिती आहे. एकांगी पडला असताना त्यावर दबाव टाकला जातो आहे. बदनाम केले जात आहे. ओबीसी नेते जे पुढे आले त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

‘माविआ’ मध्ये गृहकलह, ठाकरेंना फक्त 44 जागा, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube