‘…तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

  • Written By: Published:
‘…तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंन (Manoj Jarange) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मनोज जरांगे यांच्यात सतत शाब्दीत चकमकी होत असतात. आता आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडक (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटलांसह शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनिल थत्तेंच्या विधानांनी उडणार खडबळ 

जरांगेंची मागणी संवैधानिक नाही, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, असं विधान आंबेडकरांनी केलं.

अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मात्र आता लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचं म्हटलं.

‘माविआ’ मध्ये गृहकलह, ठाकरेंना फक्त 44 जागा, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा 

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच कोणते उमेदवार पाडणार, याची यादीही जाहीर करणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील विधानसभेची निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवार यांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालवत होते. हे व्हेरी क्लियर्ड झालं. मराठा नेते म्हणजे शरद पवार अशी चर्चाही ओबीसींमध्ये सुरू आहे, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

जरांगेंची मागणी संवैधानिक नाही
पुढं बोलतांना ते म्हणाले, मनोज जरांगे यांची भूमिका लवचिक नाही. त्यामुळं मराठा समाजाचे नुकसान होत आहे. जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल असे वाटत नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. जरांगेंची मागणी संवैधानिक नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. आमची भूमिका स्पष्ट आहे. गरीब मराठा, रयतेतील मराठा यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube