दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आ.आशुतोष काळे यांचा पुढाकार; मोफत वाहन सुविधा करून दिली उपलब्ध

आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध.

  • Written By: Published:
Untitled Design (49)

Free transportation facility for the disabled : कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्याकरिता आमदार आशुतोष काळे (MLA Aashutosh kale) यांच्या पुढाकारातून दिव्यांग (disable)विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र, UDID कार्ड, आरोग्य तपासणी नोंदी, दिव्यांग सहाय्यक साधनांसाठी लागणारे पात्रता अहवाल, तसेच शालेय शिष्यवृत्ती (Scholarship) अर्जांसाठी आवश्यक वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांच्या (Documents) प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोपरगाव ते अहिल्यानगर प्रवास करताना वाहतुकीच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.

दिव्यांगाना घेऊन पालकांना प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी डॉ.जितेंद्र रणदिवे, डॉ.सपना भंडारी, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीरमामू कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, सुनिल शिलेदार, शिवाजीराव खांडेकर, तुषार गलांडे, इम्तियाजभाई अत्तार, सोमना आढाव, संतोष शेलार, मनोज नरोडे, अमित आगलावे, सुनिल फंड, वैभव कानडे, दादा नाईकवाडे, विजय त्रिभुवन, जनार्दन कदम, शुभम काळे, मुकुंद भूतडा, अर्जुन मरसाळे, राजेंद्र उशिरे, अनिरुद्ध काळे, सुवर्णा मगर, राजेंद्र पाखर, कांतीलाल गुरसळ, सचिन म्हस्के, राणी रोडे आदींसह दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

यामुळे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग संदर्भात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून कागदपत्र प्रक्रिया अधिक गतीमान होणार आहे. हॉस्पिटलमध्ये आजच्या दिवसासाठी विशेष दिव्यांग काउंटरची व्यवस्था करण्यात आली असून तज्ञ डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, नेत्रतज्ञ, श्रवणतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांची दिव्यांगत्व प्रमाणपत्रे तातडीने तयार करण्यात येणार असून शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि विशेष शिक्षणासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणीही होणार आहे.

त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या सोयीनुसार जाऊ शकत नाही व त्याला त्याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अडचणी येवू शकतात ही अडचण लक्षात घेवून आमदार आशुतोष काळे यांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेवून मतदार संघातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोपरगाव येथुन अहिल्यानगरला जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे ७० दिव्यांग विद्यार्थ्यांसह 140 व्यक्तींना वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली असुन त्यांची अडचणी दुर करून पालकांचा आर्थिक भार आमदार आशुतोष काळे यांनी कमी केला आहे.

follow us