Download App

उमेदवार कोण याच्याशी काही देणंघेणं नाही…; विखेंचा राम शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम वाजू लागले आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. मी एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गाव चालो अभियानात फिरत आहे. खासदार म्हणून नाही. सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे. नगर दक्षिण जागेवर उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, अशा शब्दात विखे यांनी नगर दक्षिणच्या जागेवर भाजपकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे.

Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

राज्यभर भाजपकडून गाव चलो अभियान राबविले जात आहे. लोकसभेच्या अनुषंगाने या अभियानाने देखील महत्व प्राप्त झाले आहे. यातच नगर दक्षिण लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत आहे. तर राम शिंदे यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे. ठाकरे गट देखील या जागेसाठी दावा करत आहे. प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या नगर दक्षिणमध्ये यंदाची निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार असे दिसत आहे.

डिलिव्हरी बॉय पाहतांना तिला अश्रू अनावर, अभिनेत्रीने कडकडून मिठी मारून दिला धीर 

दरम्यान नगर दक्षिणच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजपातच दावे केले जात आहे. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, आम्ही गाव चलो अभियान राबवत आहोत. मात्र या पोस्टरवर कोणत्याही आमदार तसेच खासदार यांचा फोटो नाही. केवळ आणि केवळ मोदी यांचा फोटो आहे. आमचा उद्देश एकच आहे कि, 2024 ला पुन्हा मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावे.

मी देखील एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून फिरत आहे. इथे मी खासदार म्हणून आलो नाही. सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करत फिरत आहेत. उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, अशा शब्दात विखे यांनी नगर दक्षिणच्या जागेवर भाजपकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. दरम्यान राम शिंदे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. यावर आता विखे यांनी मांडलेली भूमिका ही अप्रत्यक्षरित्या शिंदे यांना टोला लगावल्याचं दिसत आहे.

जिल्ह्यातील कायदा – सुव्यवस्थेवर विखे म्हणाले…
जिल्ह्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरश: धोक्यात आली आहे. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात ज्या काही घटना घडल्या, त्याबहुतांश घटनांमध्ये जरी एखादा पदाधिकारी एखाद्या पक्षाशी संबंधित असला तरी मात्र या घटना व्यक्तिगत वाद, द्वेषाची भावना यामधून घडल्याचे दिसते आहे. तरी देखील अशा घटना रोखणे व यावर निर्बंध कसे येतील याकडे प्रशासन लक्ष देत आहे. तसेच पोलीस यंत्रणेला देखील सुधारण्याची गरज आहे, ते देखील त्या दृष्टीने पाऊले टाकतील, असा विश्वास यावेळी खासदार विखे यांनी व्यक्त केला.

follow us