डिलिव्हरी बॉय पाहतांना तिला अश्रू अनावर, अभिनेत्रीने कडकडून मिठी मारून दिला धीर

  • Written By: Published:
डिलिव्हरी बॉय पाहतांना तिला अश्रू अनावर, अभिनेत्रीने कडकडून मिठी मारून दिला धीर

Delivery boy Film : सरोगसी मदर हा विषय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी तसा नवीन राहिलेला नाही. या विषयावर बेतलेले अनेक चित्रपट आजवर झाले आणि त्यांना चांगलं यशही मिळालं. आताही सरोगसी मदर याच विषयावरील डिलिव्हरी बॉय (Delivery boy) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली… 

लुसिया एंटरटेनमेंट प्रॉडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आठवड्याच्या शेवटी अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम सध्या चित्रपटगृहांना भेटी देत आहे. नुकतीच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी या चित्रपटाची कथा अनेकांना भावल्याचे दिसून आले. याशिवाय चित्रपट पाहून काही महिला खूप भावूक झाल्या, काही महिलांनीही यावेळी आपले अनुभव शेअर केले.

वरिष्ठ समजून घेतल्याचे दाखवायचे, पण निर्णयावर येत नव्हते : अजितदादांचे लक्ष्य पुन्हा शरद पवार! 

अंकिताला मिठी मारूनही एक महिला रडताना दिसली. अभिनेत्रीने त्या महिलेला आधार दिला. हा व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे. एकंदरीत ‘डिलिव्हरी बॉय’ बघून काहींना अश्रु अनावर झाले होते. एखाद्या सिनेमाला प्रेक्षकांकडून असा प्रतिसाद मिळणं ही त्यांच्यासाठी कौतुकाची थापच म्हणावी लागले.

कथानक-
या चित्रपटाची कथा रिअल इस्टेट एजंट दिगंबर कानतोडे उर्फ ​​दिग्याभाऊ आणि त्याचा मित्र चोच्या यांची आहे. अमृता देशमुख नावाची एक तरुण डॉक्टर हॉस्पिटलसाठी बंगला पाहण्यासाठी दिग्याकडे येते. दिग्या तिला बंगला दाखवतो. मातृत्वाचा अनुभव न घेऊ शकणाऱ्या महिलांना मातृत्वाचा आनंद देण्याच्या विचाराने अमृताने बंगल्यात ममता प्रजननं केंद्र सुरू करते. तर दिग्या कमिशनच्या बदल्यात महिलांना सरोगसीसाठी तयार करतो. पण त्यात काही अडथळे येतात.

दरम्यान, हसता हसता पटकन डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केलं. तर मोहसीन खान यांनी दिग्दर्शन केलं. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांनी या सिनेमात दमदार भूमिका साकारल्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube