Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’च्या नव्या पोस्टरने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष, ‘या’ दिवशी सिनेमा होणार रिलीज

Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’च्या नव्या पोस्टरने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष, ‘या’ दिवशी सिनेमा होणार रिलीज

Delivery Boy Poster Release: मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy ) या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. (Marathi Movie) पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या (Prathamesh Parab) हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही (Ankita Lande Patil) दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delivery Boy – डिलिव्हरी बॉय Film (@deliveryboythefilm)


त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत.

या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’

बॉक्स ऑफिसवर कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ने केली निराशा, बजेटच्या तुलनेत केली फक्त इतकीच कमाई

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या सिनेमाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकिता लांडे पाटील ,प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. टाईमपास, ढिशक्यांव, टकाटक आणि एक नंबर या चित्रपटांमधून प्रथमेश चाहत्यांच्या भेटीला आला. आता त्याच्या ‘डिलिव्हरी बॉय’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube