Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा

Mahadev Jankar criticized BJP :  भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सतत येत आहेत. खुद्द मुंडे यांनीही काही प्रसंगी नाराजी बोलून दाखविली होती. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन महिने ब्रेक घेणार असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या नाराजीवर त्यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी भाष्य केले. जानकर नगर […]

Pankaja Munde : ..तर मी पंकजा मुंडेंना CM करेन ! महादेव जानकरांचा भाजपला इशारा

Pankaja Munde : ..तर मी पंकजा मुंडेंना CM करेन ! महादेव जानकरांचा भाजपला इशारा

Mahadev Jankar criticized BJP :  भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सतत येत आहेत. खुद्द मुंडे यांनीही काही प्रसंगी नाराजी बोलून दाखविली होती. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन महिने ब्रेक घेणार असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या नाराजीवर त्यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी भाष्य केले.

जानकर नगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये जास्त त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन घ्यायला जाईन. पंकजा या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या माझ्या बहिण आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय ती जबाबादारी मी देईन. मात्र सध्या दिल्या घरी सुखी राहा इतकेच मी पंकजा मुंडे यांना सांगेन. ज्यावेळी पंकजांना भाजपमध्ये त्रास होईल तेव्हा मी बहिणीला साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल, असे जानकर म्हणाले.

Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!

जानकर यांनी भाजपाच्या सध्याच्या राजकारणावरही जोरदार टीका केली. मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजपबरोबर गेलो होतो. मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. पण, आताचे नेते स्वतःला त्यांच्यापेक्षा जास्त हुशार समजतात. म्हणून कदाचित त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नसेल. त्यामुळे आम्हीही आता भाजपाच्या मागे लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एक फोन अन् विधानपरिषदेतून माघार

दरम्यान, मला अनेकदा डावलण्यात आलं पण मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. 2019 मध्ये विधानपरिषद निवडणुकांसाठी तयार करा असे मला सांगण्यात आले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी थांबण्यास सांगितले गेले. या मुद्द्यावरही मी कधीच भाष्य केले नाही. पक्षाच्या तत्वांचे नेहमीच पालन केले. पक्षाच्या विरोधात कधीच काम केले नाही असे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

Exit mobile version