Ahmednagar Mahakarandak : अहमदनगर शहरामध्ये सध्या शहराला सांस्कृतिक व्यासपीठ (Ahmednagar Mahakarandak ) देणार आणि रसिकांच्या मनोरंजनाची भूक भागवणारी अहमदनगर महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा सुरू आहे. यावर शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष व अहमदनगर महाकरंडकचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’
यावेळी ते म्हटले की, या स्पर्धेला अकरा वर्षे पूर्ण झाले. 2013 ला ही स्पर्धा सुरू करण्यामागचा हेतू होता की, अहमदनगर शहराला एक सांस्कृतिक व्यासपीठ मिळावं. मला एकांकिका काय हे देखील माहित नव्हतं. त्यावेळी राज्यभरातील लोकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी सर्वात जास्त बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती. जी आता जवळपास तिप्पट झाली आहे. तर मी जेव्हा पहिल्या वर्षी एकांकिका पाहिल्या. तेव्हा लक्षात आलं की, हे सर्व स्पर्धक विद्यार्थी स्वखर्चाने अहमदनगरपर्यंत येतात हा खर्च त्यांना जास्त होणार असेल तर ते का येतील? त्यामुळे महावीर प्रतिष्ठानकडून त्यांच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली.
One Nation One Election साठी आयोगाच्या हालचाली! EVM साठी 10 हजार कोटींचा खर्च, केंद्राला पत्र
तसेच या स्पर्धे मागचा उद्देश म्हणजे अहमदनगर ही सांस्कृतिक शहर आहे. मात्र तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होत नसतील तर शहराची संस्कृती बिघडते. त्यातच आजकालच्या सोशल मीडियामुळे लाईव्ह मनोरंजन आणि रंगमंचाचे महत्त्व पिढीला पटवून देणे गरजेचे असतं. तसेच अहमदनगर महाकरंडकमधून येणारी कलाकार हे जर चित्रपट मालिका आणि कार्यक्रमांमध्ये झळकत असतील तर ते देखील या स्पर्धेचे मोठे यश आहे. त्याचबरोबर एकांकिकांमधून अत्यंत महत्त्वाचे सामाजिक आणि विचार करायला लावणारे विषय हाताळले जातात. त्यामुळे नवीन वर्षासह अहमदनगर महाकरंडकची उत्सुकता असते
महावीर प्रतिष्ठान आणि शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन या स्पर्धेसाठी दरवर्षी नवनवीन थीम तयार करत असते. यावर्षी जत्रा ही थीम तयार केली आहे. कारण जत्रा ही गावाला लाईव्ह मनोरंजन करणारी एक गोष्ट असते. त्यामुळे ही जत्रा तेथील चावडी असं सगळं इथे गावाकडचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देखील या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे. अशी प्रतिक्रिया फिरोदिया यांनी दिली.
या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर लेट्सअप तर असोसिएशन विथ आय लव्ह नगर आहे. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत आपली भूमिका बजाविली आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र स्पर्धेचे बँकिंग पार्टनर होते.