सगळ्यांना AI शिकावेच लागणार, ही काळाची गरज : नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. AI मुळे बदलांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला AI शिकावेच

  • Written By: Published:
Narendra Firodia

Narendra Firodia : शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. AI मुळे बदलांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला AI शिकावेच लागणार आहे. AI चा उपयोग करुन आपण अनेक कामं सोपी करु शकतो, त्यामुळे प्रत्येकाने AI शिकावे, असे मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले. पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात (Ajinkya D. Y. Patil University) EDUCONTECH-25 ही राज्यस्तरीय परिषद अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि क्रीपॉन एड्युटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) बोलत होते. यावेळी लेखक अच्युत गोडबोले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार जैन, क्रीपॉन एड्युटेक प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बगाडे (Deepak Bagade) , विद्यापीठाचे रजिस्टर डॉ. सुधाकर शिंदे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ. राजेंद्र सिंग, उद्योजक भगवान गवई, लेखक किरण देसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रो. रवी आहूजा, निराली पब्लिकेशनचे जिग्नेश फुरिया हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी फिरोदिया म्हणाले, ”AI आणि इतर तंत्रज्ञान सतत बदलत आहेत. आपली ही शेवटची पिढी असेल ज्या पिढीने पाटीपासून आयपॅड पर्यंतचा प्रवास बघितला आहे. आत्ताच्या मुलांना पाटी काय आहे हे समजणार नाही. त्यामुळे इथून पुढचे जग झपाट्याने बदलणार आहे. या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर सतत आपल्या अपग्रेड व्हावे लागेल आणि नवीन गोष्टी शिकायला लागतील, असेही फिरोदिया म्हणाले.

या परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नवीन संधी आणि AI मुळे होणाऱ्या बदलांवर चर्चा झाली. तसेच या परिषदेमध्ये अनेक पॅनल होते त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. परिषदेला राज्यभरातील 200 पेक्षा जास्त कोचिंग क्लास चालक, 20 पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालकांची उपस्थिती तसेच शिक्षक, तंत्रज्ञान कंपन्या, प्रकाशन संस्था यांचा सहभाग होता. शैक्षणिक उद्योजकतेसाठी परिषदेत सविस्तर चर्चा झाली.

मोठी बातमी, ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा

यावेळी “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन लीडरशिप अवॉर्ड”, “डिजिटल लीडरशिप इन एज्युकेशन अवॉर्ड” यांसारख्या विविध पुरस्कारांनी क्लासचालकांचा सन्मान करण्यात आला. “EDUCONTECH-25” ही परिषद महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवसायाला गती देणारी ठरली.

follow us