One Nation One Election साठी आयोगाच्या हालचाली! EVM साठी 10 हजार कोटींचा खर्च, केंद्राला पत्र

One Nation One Election साठी आयोगाच्या हालचाली! EVM साठी 10 हजार कोटींचा खर्च, केंद्राला पत्र

One Nation One Election : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, निवडणूक आयोगाला (Election Commission) नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) खरेदी करण्यासाठी दर पंधरा वर्षांनी सुमारे 10 हजार कोटी रुपये लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)सरकारला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.

Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?

निवडणूक आयोगानं पत्रात म्हटलं आहे की, ईव्हीएमचे वय पंधरा वर्षे असल्याचे म्हटले आहे. एकाचवेळी निवडणुका घेतल्यास, तीन फेऱ्या निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएमचा एक मशीन वापरता येते. यंदा सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी देशभरात सुमारे 11.80 लाख मतदान केंद्र तयार करावी लागणार आहेत.

Ayodhya : प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या ‘बातम्यांबाबत’ काळजी घ्या… मोदी सरकारची तंबी!

एकाचवेळी निवडणुका दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर EVM चे दोन मशीन (एक लोकसभा निवडणुकीसाठी आणि दुसरं मशीन विधानसभा निवडणुकीसाठी) आवश्यक असणार आहे.

आयोगाने सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मशिन्स निवडणुकीच्या दिवसासह मतदानाच्या विविध टप्प्यांमध्ये काही सदोष युनिट्सची बदलण्याची गरज पडते.

आयोगाने गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये कायदा मंत्रालयाला पत्र लिहिले होते. यामध्ये विविध बाबी लक्षात घेऊन एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी किमान 46 लाख 75 हजार 100 बॅलेट युनिट, 33 लाख 63 हजार 300 कंट्रोल युनिट आणि 36 लाख 62 हजार 600 VVPAT मशिन्सची आवश्यकता असल्याचं म्हटलं होतं.

गत वर्षीच्या सुरुवातीला ईव्हीएमची तात्पुरती किंमत प्रति बॅलेट युनिट 7,900 रुपये, प्रति कंट्रोल युनिट 9,800 रुपये आणि 16,000 रुपये प्रति व्हीव्हीपीएटी होती. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने अतिरिक्त मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ईव्हीएमसाठी वाढीव स्टोरेज सुविधा आणि अधिक वाहनांची गरज यावर भर दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube