Sangram Jagtap : काही दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar)शहरात गुन्हेगारीनं (Crime)डोकं वर काढलं आहे. आता याच प्रश्नावरून नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)चांगलेच संतापले आहेत. आमदार जगतापांनी थेट पोलीस अधीक्षक(Superintendent of Police) कार्यालयात जाऊन थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत गुन्हेगारीला आळा घालावा अन्यथा मंगळवारी (दि.28) आडते बाजारातील डाळ मंडई येथे व्यापाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
Sangeet Devbabhali: 6 वर्षापूर्वी सुरु झालेलं ‘संगीत देवबाभळी’ नाटक आता घेणार निरोप
नगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आडते बाजार, डाळमंडई, एम.जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण हे वाढत चालले आहे. चोरट्यांचे मोठे रॅकेट सध्या नगर शहरात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या चोरटे थेट व्यापाऱ्यांवर हल्ले करत आहेत. व्यापारीवर्गात सध्या भीती निर्माण झाली आहे. याबाबात वेळोवेळी पोलीस स्टेशनला निवेदन देखील देण्यात आले आहे.
Government Schemes : बचत गट महिला समृध्दी कर्ज योजना आहे तरी काय? वाचा!
दरम्यान याचबाबत आज आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली. ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र चोपडा, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. या बैठकीला कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे हे देखील उपस्थित होते.
पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना किंवा चोऱ्या कशा रोखता येतील? याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. तसेच ज्या चोऱ्या झाल्या आहेत, त्याबाबतीत योग्य असा तपास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत. नगर शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक नाही राहिला, अशी परिस्थिती नगर शहराची कधीच नव्हती. अलीकडच्या काळात व्यापाऱ्यांना टार्गेट करून लुटीचे प्रकार वाढलेत. यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने पावलं उचलत गुन्हेगारीला आळा कसा बसेल? यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी आमदार जगतापांनी केली.
…तर आम्ही उपोषणाला बसणार :
नगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नगर शहर पोलीस दलाने ठोस भूमिका न घेतल्यास व्यापाऱ्यांसह आपण आडते बाजारमधील डाळ मंडई येथे मंगळवारपासून (दि.28) बेमुदत उपोषण आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील तातडीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.