Download App

Ahmednagar News : 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला 3 वर्षांची शिक्षा

Ahmednagar News : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलगी शेतात काम करीत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचं कामकाज सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, पीडित मुलगी आईसोबत शेतात काम करीत होती. त्याचवेळी शेताजवळत राहणाऱ्या आरोपी पोपट म्हातारदे फुंदे (50) याच्या संत्र्याच्या बागेत शेळी पाहण्यासाठी पीडित मुलगी गेली. त्याचवेळी आरोपीने तिला मोबाईल गेम खेळण्यासाठी दिला. पीडित मुलगी मोबाईलवर गेम खेळत असतानाच आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

Maratha Aarakshan : मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक आहे? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

याचवेळी गावातील एका व्यक्तीने सदरची घटना पाहुन आरडा-ओरड केली. त्यानंतर आरोप घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीने आईला सांगितलं, त्यानंतर पीडित मुलीने आणि आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांत भा.द.वि. कलम ३५४ अ , कलम ७, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोरच PM मोदींचा सवाल

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले असून यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी, आई, पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात पाथर्डी नगरपरिषदेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने ‘या’ तीन संघांना फायदा; टीम इंडियाचं काय?

दरम्यान, सदरील खटल्याचं कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले असून या प्रकरणात तपासकामी पोलिस कर्मचारी अडसूळ, अरविंद भिंगारदिवे यांनी सहकार्य केले आहे.

Tags

follow us