Sujay Vikhe : ‘कुणाच्या नाड्या कशा आवळायच्या मला ठाऊक’; साखरपेरणीनंतर विखेंचाही ‘कडू’ डोस

Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिवाळी सणानिमित्त साखर वाटली पण उत्तर जिल्ह्यातील नागरिकांना. त्यांची ही दिवाळीची साखरपेरणी विरोधकांच्या निशाण्यावर आली. दक्षणेचे खासदार असताना साखर मात्र उत्तरेत वाटता असे म्हणत त्यांच्यावर टीकाही झाली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड आघाडीवर होते. त्यांच्या टीकेला […]

Sujay Vikhe : मशाल घ्या तुताऱ्या घ्या आणि वाजवा; खासदार विखेंची ठाकरे-पवारांवर टीका

Sujay Vikhe

Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिवाळी सणानिमित्त साखर वाटली पण उत्तर जिल्ह्यातील नागरिकांना. त्यांची ही दिवाळीची साखरपेरणी विरोधकांच्या निशाण्यावर आली. दक्षणेचे खासदार असताना साखर मात्र उत्तरेत वाटता असे म्हणत त्यांच्यावर टीकाही झाली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड आघाडीवर होते. त्यांच्या टीकेला विखेंनी आधीही उत्तर दिले होते. मात्र नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी पु्न्हा संधी साधत विरोधकांना खोचक शब्दांत इशाराच दिला. कुणाच्या नाड्या कशा आवळायच्या हे मला चांगलंच कळतं अशा शब्दांत त्यांनी नगर शहरातील विरोधकांवर निशाणा साधला.

नगर शहरातील नेप्ती रोडवरील सीना नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन खादर सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार शाब्दिक टोले लगावले. विखे म्हणाले, दिवाळी गोड करण्याची जबाबदारी ही काय खासदारांची आहे का? गेल्या तीस वर्ष दिवाळी कुठं होती? काहींनी आमदारकी उपभोगली मात्र त्यांनी काही केलं ? अशा शब्दात विखेंनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. तसेच मी साखर वाटप माझ्यावर टीका व्हावी यासाठी केली. मला माहित आहे कि बोलणारं एक आहे व स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. नगरमध्ये हे चालत आलं. लिहिणारा वेगळा वाचक वेगळा. कोणाच्या नाड्या कशा आवळायच्या मला चांगलं माहीत आहे.

मतदान दक्षिणेतून अन् साखर उत्तरेत; विखेंच्या साखरेला ठाकरे गटाचा कडवा डोस

माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर उत्तरेत साखर वाटप केल्यावरून जोरदार टीका केली होती. यावर देखील विखेंनी प्रत्युत्तर दिले. मी उत्तरेत साखर वाटली तर काहींनी माझ्यावर टीका केली. दिवाळी गोड करण्याची जबाबदारी हि काय खासदारांची आहे का? गेल्या तीस वर्ष दिवाळी कुठं होती? काहींनी आमदारकी उपभोगली मात्र त्यांनी काही केलं ? तुम्ही ज्या चार वर्षाच्या खासदारांकडून हिशोब मागता तर तुम्ही देखील तुमच्या तीस वर्षांच्या कार्यकाळातला हिशोब देणं लागतं अशा शब्दात विखे यांनी विक्रम राठोड यांचा नामोल्लेख टाळत उत्तर दिले.

आमची जोडी अनेकांना खटकतेय

अनेकांना आम्ही एकत्र काम केलेलं पाहवत नाही मात्र नगरच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत असतो. पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही नगरच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. काही लोकांना केवळ राजकारण करायचं आहे. काहींनी आयुष हॉस्पिटल येथे जाऊन आंदोलन केले मात्र सर्वाधिक गतीने आयुष हॉस्पिटल उभारले आहे मात्र काही लोकांकडून राजकारण केले जाते अशा शब्दांत खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे किरण काळे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

Ahmednagar News : आमचा फराळ गोड पण साखर विकतची, आमचे कारखाने नाही; शिंदेंचा विखेंना टोला

बोलणार एक व स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा

आपल्याकडे दोन दिवाळी साजऱ्या होणार आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर खुले होणार आहे. त्यानुषंगाने आपण राज्यातच नव्हे तर देशात अत्यंत मोठी दिवाळी साजरी करू. मी साखर वाटप त्यासाठी केली होती की माझ्यावर टीका व्हावी. मला माहिती आहे कि बोलणारा एक आहे व स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. नगरमध्ये हे चालत आलं. लिहिणारा वेगळा वाचक वेगळा.कोणाच्या नाड्या कशा आवळ्याच्या मला चांगलंच माहीत आहे.

Exit mobile version