Download App

चाऱ्याच्या टंचाईची भीती; नगर जिल्हा प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Ahmednagar News : राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. नद्या, नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शेतातील पिके संकटात सापडली आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील अनेक तालुके कोरडेच आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातून चारा वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अहमदनगर भाजपच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल…जाणून घ्या प्रकरण

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3 लाख 41 हजार 22 मेट्रीक टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 3.8 महिने पुरेल. चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चाऱ्याची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मूरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. तसेच हा आदेश पुढील दोन महिन्याच्या कालावधीकरीता लागू राहणार आहे, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे जोरदार पाऊस

राज्यात जुलै महिन्यातच इतका मुसळधार पाऊस होण्यामागे कारण आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे.

Tags

follow us