Download App

Ahmednagar News : पाणीबाणी! काही होऊ जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही…

Image Credit: Letsupp

Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News ) जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यंदाच्या वर्षी काही झाले तरी जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही. तसेच यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, असा निर्धार सर्वपक्षिय पाणी परिषदेमध्ये करण्यात आला. कारण यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी धरणांमध्ये पाणीसाठा अपेक्षित असा झाला नाही आहे. यामुळे पाण्यासाठी लढाई आता तीव्र होण्याची संभावना निर्माण झाली आहे.

Ahmednagar News : गडाखांच्या प्रयत्नांना यश…सरकार बॅकफूटवर; विकासकामांची स्थगिती उठली

यंदाच्या वर्षी पावसाने जिल्ह्याकडे काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे काही धरणे वगळता इतर धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा निर्माण झालेला नाही आहे. तसेच उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये 50 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये जानेवारीपासून पाणीबाणीची समस्यां उभी राहणार आहे अशी शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फोसिसचा इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का; यंदाच्या वर्षी कॉलेज कॅम्पस भरतीला ब्रेक

भविष्यातील पाणी टंचाईचे संकट पाहता श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय पाणीपरिषदेचे श्रीरामपूर बाजार समितीच्या शेतकरी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. पाण्यासाठी उभारण्यात आलेल्या या लढ्यासाठी नागरिक एकटवाले मात्र या परिषदेला तिन्ही तालुक्यांचे लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्टाचे विधासनभा अध्यक्षांना निर्देश

या परिषदेला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके, परिषदेचे निमंत्रक जितेंद्र भोसले, तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडदे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, कॉ. आण्णासाहेब थोरात, अशोक थोरे, नागेश सावंत, अशोक बागुल, रविंद्र मोरे, सुभाष त्रिभुवन, कैलास बोर्डे, अभिजीत लिप्टे आदी उपस्थित होते.

यावर्षी भंडारदरा लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये यावर्षी जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करण्याचे ठरले. तसेच सर्वप्रकारे आंदोलन करून पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार वक्त्यांनी केला. सन 2005 साली झालेला समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. समन्याय म्हणजे सर्वांना सारखे पाणी परंतु तसे न होता, जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो, असे मत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केले.

Tags

follow us

वेब स्टोरीज