इन्फोसिसचा इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का; यंदाच्या वर्षी कॉलेज कॅम्पस भरतीला ब्रेक

इन्फोसिसचा इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का; यंदाच्या वर्षी कॉलेज कॅम्पस भरतीला ब्रेक

मुंबई : भारताच्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. यंदाच्या वर्षी कंपनीकडून कोणत्याही कॉलेजमध्ये कॅम्पस भरती केली जाणार नसल्याची घोषणा कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी निलांजन रॉय यांनी केली. ते कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या अर्निंग कॉलदरम्यान बोलत होते. गतवर्षी कंपनीने मागणीपेक्षा जास्त 50 हजार फ्रेशर्सची भरती केली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. (Infosys company will not do campus recruitment in any college)

रॉय म्हणाले, गेल्या वर्षी, आम्ही 50,000 पदवीधरांची भरती केली होती. मागणीच्या अगोदर त्यांना कामावर घेण्यात आले होते. आमच्याकडे अजूनही फ्रेशर्सची संख्या मोठी आहे. अर्थात, आम्ही त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इत्यादीचे प्रशिक्षण देत आहोत. त्यामुळे सध्या आम्ही कॅम्पसमध्ये जाणार नाही. आम्ही आमच्याकडील प्रोजेक्ट्स आणि मनुष्यबळ याबाबत प्रत्येक तिमाहीत विचार करु आणि त्याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube