Ahmednagar News : गडाखांच्या प्रयत्नांना यश…सरकार बॅकफूटवर; विकासकामांची स्थगिती उठली

Ahmednagar News : गडाखांच्या प्रयत्नांना यश…सरकार बॅकफूटवर; विकासकामांची स्थगिती उठली

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) नेवासा तालुक्‍यातील अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय बंड होऊन यामधून सत्तापालट झालं. त्यांनतर नगर आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्‍यात एकूण 78 कोटी रुपयांचे कायम मंजूर करण्यात आली होती. मात्र सत्तांतरानंतर या कामांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र विकासकामांसाठी गडाख यांनी न्यायालयीन लढा दिला व अखेर त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले आहे. या सर्व कामांवरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

गडाखांच्या वतीने स्थगिती उठवण्यासाठी याचिका

राज्यात सत्तांतर झाले व सत्तेतून विरोधी पक्षात गेलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील विकास कामांच्या निधींबाबत अडचणी निर्माण झाल्या. अनेक मंजूर कामांवर रश्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली. दरम्यान आमदार गडाखांच्या मतदार संघातील काही कामांबाबत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आमदार शंकरराव गडाखांच्या वतीने कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, रमेश जंगले, ज्ञानेश्‍वर बोरुडे, बाळासाहेब सोनवणे, भगवान आगळे यांनी सदर कामांची स्थगिती उठवण्यासाठी याचिका दाखल केली.

इन्फोसिसचा इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का; यंदाच्या वर्षी कॉलेज कॅम्पस भरतीला ब्रेक

सदर याचिकावर औरंगाबाद येथील न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमुर्ती देवेंद्रकमार उपाध्याय व डॉ. आरिफ यांच्या समोर ( दि.4) ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन शिंदे सरकारने कामांना स्थगिती देणारा अध्यादेश रद्द केला आहे. सदर कामावरील स्थगिती उठल्यामुळे लोकांची दळवळणाची होणारी गैरसोय दूर होणार आहे. अनेक दुरावस्था झालेल्या रस्त्यांची कामे आता मार्गी लागणार आहे. या कामावरील स्थगिती उठल्यामुळे विकासकामांना वेग येणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा : सुप्रीम कोर्टाचे विधासनभा अध्यक्षांना निर्देश

गडाखांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरूच

नेवासा तालुक्यातील विविध विकासकामांचे अजूनही कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल असून त्याचा पाठपुरावा आ. शंकरराव गडाख यांच्या मार्फत सुरू आहे. दरम्यान सध्या ज्या विकास कामांवरील स्थगिती उठवली आहे यामुळे मतदार संघाचा विकास होण्यास मदत होईल अशी भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube