Download App

तहसीलदार-अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावर तर जनतेचे प्रश्न वाऱ्यावर, ठाकरे गटाचा विखेंवर निशाणा

Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची भरपाई तसेच मागील राहिलेल्या पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदनातून दिला आहे. नगर जिल्ह्यातले महसूल विभागातील अधिकारी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe) यांच्या वाड्यावर कायमच असतात यांना जनतेचे काही देणे घेणे नाही असा घणाघती आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीसोबत जाणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

निवेदनामध्ये पुढे म्हटले की, दि. २६ नोव्हेंबर २०२३ पासून नगर जिल्हयामध्ये आवकाळी पाऊस व गारपिठीमध्ये जिल्हयातील शेतीचे विशेष करून कांदा, कपासी, गहू, ज्वारी, तुर, हरभरा या पिकांचे खुप मोठयाप्रमाणात नुकसान झालेले आहे. पारनेर तालुक्यात गारपिटीने नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे राहुरी तालुक्यात देखील काही जनावरे, शेळया मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून बऱ्याच घरांची पडझड झालेली आहे. जिल्हयातील शेतकरी उध्वस्त झालेला आहे. ब-याच ठिकाणी पंचनामे देखील झालेले नाही. तरी तातडीने सर्व ठिकाणी पंचनामे करून शेतक-यांना ताबडतोब मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

‘मराठ्यांना नडू नका’; महाजनांच्या ‘त्या’ विधानावरुन जरांगे पाटलांनी धमकावलंच

जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून शेती व जनावरांसाठी तसेच पिण्यासाठी पाणी पुढील काळात राहणार नाही. तरी प्रशासनाने पुढील काळात पिण्याचे पाणी व जणावरांना लागणा-या चाऱ्याची व्यवस्था करावी. फळबागेसाठी अनुदान दयावे. शेतीसाठी विज फक्त ३ ते ४ तास उपलब्ध असते ती किमान दिवसा १२ तास उपलब्ध व्हावी., त्यातच आज दुधाचे भाव खुप कमी झाले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणुन दुध व्यवसायाकडे पाहिले जाते त्यामुळे दुधाचे दर वाढवून मिळावे असे निवेदनात म्हटले आहे.

अधिकारी साहेबांच्या वाड्यावर…
राहता, संगमनेर, कोपरगाव येथील अधिकारी तहसीलदार हे विखेंच्या वाड्यावरच असतात त्यांना जनतेच्या कामांचं काहीच देणे घेणे राहिलं नाही .अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत तर काही ठिकाणी अडवणुकीची भूमिका घेतात ,त्यामुळे जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे ,जर वेळीच यांना अटकाव केला नाही तर याची आम्हाला गांभीर्याने दखल घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. जर आठ दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

Tags

follow us