Ahmednagar News : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी ज्या गाळ्यांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे गाळे पाडण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता संबंधित व्यापारी हे आक्रमक झाले असून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधातील गाऱ्हाणे व्यापारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी नेणार आहे. यामुळे यावर आता काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Salaar Trailer: नवा लूक अन् डॅशिंग अवतार! प्रभासच्या सालार’चा दुसरा ट्रेलर रिलीज
नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात १९९७ सालापासून २५ ते ३० व्यापारी फुलाचा व्यवसाय करत आहे. या ठिकाणी फुलांची एक चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांच्याविरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सातपुते यांच्या या निर्णयामुळे व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.
Dhananjay Munde: ‘शासनाची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’, धनंजय मुंडेंचा इशारा
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच…
सातपुते यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात आता व्यापारी आक्रमक झाले आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व द्वेषाने फुल व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. राजकारण राजकीय पातळीवर करा, व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका. फुल विक्रेते आता दिलीप सातपुतेंविरोधात आक्रमक झाले असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार असल्याचा इशारा फुल व्यापाऱ्यांनी दिला आहे.
नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, CM शिंदेंनी ताफा थांबवत जखमींना नेलं रूग्णालयात
व्यापारी म्हणाले, आधीच फुल विक्रेते गेल्या ३ वर्षांपासून कोविडमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. फुलांना भाव मिळत नव्हते, त्यामुळे शेतकरी व व्यापारी हवालदिल झाले होते. त्यातच फुल विक्रेत्यांचे गाळे पाडण्याचा निर्णय झाला. सातपुते आमची रोजीरोटी बंद करून तुम्ही आमच्यावर का अन्याय करत आहे ? तुमचा वाद ज्या लोकांशी आहे त्यांच्याशी वाद घाला, अशी संतप्त प्रतिक्रिया फुल व्यापाऱ्यांनी यावेळी दिली. जर तुम्ही आमच्या व्यवसाय आणि घरापर्यंत येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. लवकरच फुल विक्रेते यांची कमिटी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहे.