PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात(Saibaba Temple) दर्शन घेत साईंची पूजा केली. त्यानंतर अकोले (Akole)तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले.
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस हे देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते. दरम्यान मोदी आज तिसऱ्यांदा शिर्डी येथे आले आहेत. यातच आगामी काळात राज्यात निवडणुका असल्याने मोदी आज काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागेल आहे.
PM @narendramodi prays at Shri Saibaba Samadhi Temple in Shirdi, Maharashtra. pic.twitter.com/BNduJQRctu
— PMO India (@PMOIndia) October 26, 2023
दरम्यान मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आज शिर्डीत जिल्ह्याभरातून तसेच अनेक ठिकाणाहून मोठी गर्दी झाली आहे. मोदी आज शिर्डीत असल्याने शिर्डीला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे’, चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन
ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील 14 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं, विकासकामांचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते जल अर्पण करुन निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी धरणातून पाणी सोडलं. दरम्यान निळवंडे धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळी भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68,878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे.