Ahmednagar Police seized gold ornaments : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेमुळे अनेक तपासण्या सुरू आहेत. बेकायदेशीर रोकड वाहतुकीवर पथकाकडून तपासण्या सुरू आहेत. शहर व जिल्ह्यात त्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर शहरात (Ahmednagar City) एका हॉटेलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Police) मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून तब्बल 93 लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत.
पक्ष फुटला तर घरातल्या सुना परक्या वाटू लागल्या…; विखेंचा शरद पवारांना टोला
रमेशसिंह रमेशसिंह हेरसिंह राजपूत व नारायणलाल हेमराज गाडरी या दोघांकडून हे दागिने जप्त करण्यात आली आहेत. हे दोघेही राजस्थानमधील रहिवासी आहेत. या दोघांकडून सोन्याचे दागिने आहेत. परंतु त्याचे कोणतेही अधिकृत बिले त्यांच्याकडे नाहीत. तरी ही दागिने विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील माणिक चौक येथील तुलसी विहार लॉजिंगवर तपासणी केली. त्यात रमेशसिंह राजपूत याच्याकडे 91 लाख 78 हजार रुपयांचे एक किलो तीनशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 34 हजार 700 रुपये रोख रक्कम आढळून आली. तर नारायणलाल गाडरी याच्याकडे 1 लाख 36 हजार रुपये किंमतीचे पावणे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.
Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत
या दोघांकडे 93 लाख रुपयांचे सोने आढळून आले आहे. या दागिन्याबाबत दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली. दागिण्यांच्या अधिकृत बिलाबाबत विचारपूस केली. परंतु त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत बिले सोबत नव्हती. त्यामुळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचनामा करुन पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
आयकर विभागाला माहिती
ताब्यात घेण्यात आलेल्या दागिन्यांबाबत जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याबरोबर आयकर विभागाचे उपायुक्त यांनाही माहिती दिली आहे. त्यामुळे या सोन्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व आयकर विभाग कारवाई करणार आहे.
50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगतायत
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही. अधिक रक्कम मिळून आल्यास जिल्हाधिकारी निवडणूक आयोगला माहिती दिली जाते.