Download App

रस्त्यांसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको; आ. तनपुरेंचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Ahmednagar Politics : राज्यातील सरकार गतिमंद सरकार आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली. येत्या पंधरा दिवसात त्याचे कार्यारंभ आदेश न आल्यास नगर मनमाड महामार्गावर 19 सप्टेंबरला मोठा रस्ता रोको केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिला. महाविकास आघाडीच्या काळात मतदार संघातील 29 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळालेली होती. सध्याच्या गतीमान म्हणवणाऱ्या सरकारने कामांना स्थगिती दिली. त्याच्या निषेधार्थ व या कामाचे कार्यारंभ आदेश त्वरित निघावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

.. तर आम्ही G20 बैठकीचंही स्वागत करू; राऊतांचा मोदी सरकारला खोचक टोला

आरडगाव येथे राहुरी-नेवासा या रस्त्यावर हे आंदोलन झाले. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिव के. पी. पाटील यांनी पंधरा दिवसात कार्यारंभ आदेश देण्याचे तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आमदार तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघातील सुमारे 29 कोटी रुपयांची रस्ता विकासाची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात केली होती. गेल्या चार महिन्यांपासून कार्यारंभ आदेश न दिल्याने ही कामे सुरू झाली नाहीत. हे सरकार विकासाच्या कामात अडथळा करत आहेत. यांना विकासाच्या कामाच्या फाईलवर सह्या करायला वेळ नाही. मात्र विरोधकांची कामे हाणून पाडण्यात व त्यांना गुंतवण्यात वेळ आहे, अशी टीका तनपुरे यांनी केली.

राहुरी मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर येथील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर असलेल्या व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कार्यारंभ आदेश देण्यास शासनाकडून विलंब होत आहे. जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून लेखी उत्तर मिळत नाही. तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही व येथून उठणार नाही. अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. दरम्यान प्रशासनाने येत्या आठ दिवसात कारवाई करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आरक्षणाची कोंडी! मार्ग निघाला नाही तर महायुतीच्या 100 जागा धोक्यात

Tags

follow us