Ahmednagar Politics : काहीच दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे खंदे समर्थक प्रा. मधुकर राळेभात (Prof. Madhukar Ralebhat) यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांना भाजपमध्ये (BJP) येण्याचे निमंत्रण आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिले होतं. दरम्यान, आज मधुकर राळेभात यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
‘भाऊच्या धक्क्या’वर जाणवली रितेश भाऊची कमतरता; अवघ्या महाराष्ट्राने केलं लाडक्या भावाला मिस
🕓 संध्या. ४.०७ वा. | २३-०९-२०२४📍नरिमन पॉईंट, मुंबई.
LIVE | भाजपा पक्षप्रवेश सोहळा@BJP4Maharashtra#Maharashtra #Mumbai #BJP https://t.co/2G3M0Ws4ea
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2024
कर्जत जामखेडचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत मतदारसंघात उत्सुकता होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राळेभात यांच्यासह ठाकरे गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सूरज काळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
कर्जत-जामखेडची लढाई प्रस्थापित विरुध्द विस्थापित
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, मधुकर आबा राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे मी स्वागत करतो. कर्जत-जामखेडची लढाई प्रस्थापित विरुध्द विस्थापित अशी आहे. कर्जत-जामखेडमध्ये विस्थापितांसाठी राम शिंदे हे काम करत आले. आता मधुकर राळेभात यांनी भाजपात प्रवेश केला. यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलं नाही, असं फडणवसी म्हणाले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे हे नेते उपस्थित होते. दरम्यान, प्रा. राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या वतीने रोहित पवार संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याची शक्यता आहे. लोकसभेत त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन रोहित पवार यांची वाटचाल अवघड करण्याची चाल भाजपकडून खेळण्यात आली.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तिकिटाची मागणी करणार आहोत. तिकीट न मिळाल्यास रोहित पवार यांच्या विरोधातील उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देऊ, असेही राळेभात म्हणाले होते.
कर्जतमध्ये महायुतीकडून कोण लढणार?
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून राम शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे.