Ahilyanagar Railway Station : अहिल्यानगर शहरातील सर्व कार्यालयांची नावे अहिल्यानगर झाली मात्र, रेल्वे स्थानकाचे नाव बदलले नव्हते. या विरोधात अनेक निवेदने हिंदू संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आली. अखेर राज्य सरकारने काढले राजपत्र काढत रेल्वे स्थानकाचे नामकरण अहिल्यानगर केल्याचे जाहीर केले.
ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; मुंबई महानगरपालिकेने दिली परवानगी
राजपत्र जाहीर
अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्थानक हे इंग्रजकालीन आहे. त्याचे नाव अहमदनगर रेल्वे स्थानक असे होते. जिल्ह्याचे नाव बदलल्यावर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. अखेर आता राज्य सरकारने राजपत्र जाहीर करत या नामांतरावर शिक्कामोर्तब केला आहे.
नगरच्या शिल्पकलेचा जगभरात सन्मान; शिल्पकार यश वामन यांच्या शिल्पाला दुसरा क्रमांक
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. नागरिकांच्या या मागणीनंतर महायुती सरकारने नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला. नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत होत असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी केले आहे. अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वे स्टेशन देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले होते.
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शासन दरबारी केली होती. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. दरम्यान, नगर शहर आणि जिल्ह्याचे नामांतर झाल्यानंतर येथील सरकारी कार्यालयेही नावात बदल करू लागली आहेत. यात पोस्टाचीही भर पडली आहे. शहरातील मुख्य कार्यालयासह अन्य कार्यालयांतील शहर व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशा सूचना मुख्य कार्यालयाने दिल्या होत्या. यासंदर्भात एक पत्र पाठवण्यात आले. या पत्रात वरील सूचना देण्यात आल्या आहेत. या नुसार आता नगर शहरातील मुख्य जिल्हा कार्यालयासह विभागीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयांच्या नावात बदल करण्यात येत आहेत.