नगरच्या शिल्पकलेचा जगभरात सन्मान; शिल्पकार यश वामन यांच्या शिल्पाला दुसरा क्रमांक
अहिल्यानगर शहरातील युवा शिल्पकार यश सुदाम वामन यांच्या शिल्पाला दुसऱ्या क्रमांकांचं पारितोषिक मिळालं.

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात शिल्पकला चांगलीच बहरली आहे. अनेक शिल्पकार याच नगरच्या मातीत उदयास आले. येथेच घडले आणि त्यांच्या कलेचा जगभरात सन्मान झाला. जागतिक पातळीवर नगरच्या शिल्पकलेचं कौतुक होत आहे. शाबासकीची थापही मिळत आहे. याचीच प्रचिती देणारं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अहिल्यानगर शहरातील युवा शिल्पकार यश सुदाम वामन यांच्या ‘सकाळ’ (Morning) या विषयावर आधारीत शिल्पाला दुसऱ्या क्रमांकांचं पारितोषिक मिळालं. निमित्त होतं द पोड्रेट सोसायटी ऑफ अमेरिका स्पर्धेचं.
या स्पर्धेत वामन यांनी साकारलेल्या शिल्पाला दुसऱ्या क्रमांकाचं (Ahilyanagar News) बक्षीस तर मिळालंच शिवाय आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट मॅगझीनमध्ये या शिल्पाचा समावेश करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध चित्रकार जॉन सिंगर सार्जंट यांचं पॅलेटही त्यांना मिळालं. यश वामन यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी तर आहेच पण या माध्यमातून नगरचं कलाकौशल्य जगभरात पोहोचलं आहे. या स्पर्धेत दगड, ब्राँझ धातू, लाकूड, फायबर ग्लास अशा विविध माध्यमांत साकारलेल्या शिल्पांनाही पुरस्कार मिळाले. या स्पर्धेत जगभरातील जवळपास 268 स्पर्धकांनी चित्र व शिल्प पाठवली होती. यातून 20 कलाकृतींची निवड करण्यात आली. यात यश सुदाम वामन यांच्या शिल्पाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. मानधनही मिळालं आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; CM फडणवीसांची घोषणा
आणखीही काही शिल्पांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडिया वर्ष 2023 (सर्वोत्कृष्ट पारितोषिक), आर्ट सोसायटी ऑफ इंडिया वर्ष 2024 (सर्वोत्कृष्ट पारितोषिक), द बॉम्बे आर्ट सोसायटी वर्ष 2024, पद्मश्री राम सुतार सर्वोत्कृष्ट वास्तविक शिल्प पुरस्कार, 2024 – प्रथम पारितोषिक प्रेम जैन स्मारक ट्रस्ट (स्कॉलरशीप), 2023 – द्वितीय पारितोषिक प्रेम जैन स्मारक मेमोरियल ट्रस्ट (स्कॉलरशीप).
सर जे. जे. कला महाविद्यालय वार्षिक कला प्रदर्शन वर्ष 2023 आणि 2024 याही वर्षी शिल्पकला विभागातून सिल्व्हर मेडल, श्री रामपुरे कला पुरस्कार, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट वार्षिक प्रदर्शन 2022 कला शिक्षक पुरस्कार, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट वार्षिक प्रदर्शन 2025, महाराष्ट्र उच्च कला परीक्षा शिल्पकला व प्रतिमानबंध विभाग 2024 प्रथम श्रेणी प्रथम गुण या पुरस्कारांचा समावेश आहे.
स्थापत्य कला अन् काळी, राखाडी दगडं; प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील मंदिरं