Download App

…अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करू, चाकणकरांचा इशारा

Rupali Chakankar On Meera Borawankar : पुण्यातील माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borawankar)यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar)यांनी मीरा बोरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांवर बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे, त्यांनी सादर करावे अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

लेट्सअप नवदुर्गा स्पेशल: ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या विशाखा नाडकर्णी यांची मुलाखत I

नगरमध्ये एका कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली.

वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम

यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, अजित पवार हे रोखठोक पद्धतीने काम करणारे नेते आहेत. मात्र दादांवर जे आरोप केलेत ते बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी केले असावेत. जर याबाबत तुम्हाला माहिती होती तर त्याबाबत तुम्ही तेव्हाच का काही म्हणाला नाही असा सवाल चाकणकर यांनी केला.

तसेच पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या, जर याबाबत बोरवणकर यांनी पुरावे सादर केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा देखील यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिला आहे.

2010 ते 2012 च्या दरम्यानच्या त्या घटना आहेत. एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर अजितदादा ज्या पद्धतीनं काम करत आहेत, रोखठोक पद्धतीने भूमिका घेत अठरापगड जातीच्या नागरिकांचे प्रश्न सोडवणे. सर्वांना सोबत घेऊन अजितदादांचा स्थायीभाव आणि स्वभाव आहे.

याच्यामुळे अजितदादांवर केलेले आरोप तर हे चुकीचे आहेतच, पण स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने अशा प्रकारचे आरोप करणं, हा मला जरा विचित्र प्रकार वाटतो, असेही यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या. बोरवणकरांनी ज्यावेळी घटना घडल्या होत्या त्याचवेळी बोलायला पाहिजे होतं, असंही यावेळी चाकणकर म्हणाल्या.

Tags

follow us