Download App

Ahmednagar : सावेडी बसस्थानक कात टाकणार; पुनर्बांधणीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Ahmednagar : नगर शहरातील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. आता सावेडी बसस्थानक कात टाकणार आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला सुसज्ज असं सावेडी बसस्थानक पाहायला मिळण्याच्या नगरकरांच्या अपेक्षा जाग्या झाल्या आहेत.

उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्रा बॅंकेच्या एमडी, सीईओपदाचा राजीनामा, आता कोण सांभाळणार बॅंकेची धुरा?

सावेडी बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवासी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात या ठिकाणी नागरिकांना गाडीतून उतरणे देखील अशक्य होते. बसस्थानकाच्या आवारात पाणी साचल्याने प्रवाशांना आणि वाहनांना ये-जा करण्यास समस्या उद्भवत होती.

Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग

दरम्यान सदरील परिस्थिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास येताच त्यांनी योग्य पाठपुरावा करुन सदरील बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी केली होती. दरम्यान सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास लेखाशिर्ष 6फ अंतर्गत प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

या रकमेतून सावेडी येथे भव्य असे बसस्थानक उभारण्यात येणार असून यामध्ये तळमजला, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, रेन वॉटर हारवेस्टिंग, काँक्रीटीकरण आदी गोष्टींचा समावेश असेल. लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे बसस्थानक निर्माण होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tags

follow us