उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्रा बॅंकेच्या एमडी, सीईओपदाचा राजीनामा, आता कोण सांभाळणार बॅंकेची धुरा?

  • Written By: Published:
उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्रा बॅंकेच्या एमडी, सीईओपदाचा राजीनामा, आता कोण सांभाळणार बॅंकेची धुरा?

Uday Kotak : देशातील सर्वांत श्रीमंत बॅंकर्स उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला. बँकेने शनिवारी 2 सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना पाठवलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. अंतरिम व्यवस्थेनुसार, उदय कोटक यांच्या जागी सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत बँकेचा कार्यभार सांभाळतील. मात्र, बँकेला आरबीआय आणि बँकेच्या सदस्यांकडून यासाठी मंजुरी मिळणे बाकी आहे.

https://www.youtube.com/watch?v=25Um6lQDmKw

उदय कोटक यांची जानेवारी 2021 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीतय संचालक पदावर निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत होता. मात्र त्याआधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. कोटक यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते. आणि आज त्यांनी राजीनामा दिला. आता ते बँकेत बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात उदय कोटक म्हणाले, मी या अद्भुत कंपनीचा संस्थापक, प्रवर्तक आणि महत्त्वपूर्ण भागधारक म्हणून एकटा उभा होतो. बदल्यात काळात मी पढील वर्षात जगाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. 2 सप्टेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, कोटक यांनी सांगितले की, बँकेची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ते पद सोडत आहेत,असं त्यांनी सांगितलं.

Thane Crime : पत्नीची गोळी झाडून हत्या, त्याचवेळी पतीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू 

दरम्यान, बँक 1 जानेवारी 2024 पासून नवीन एमडी आणि सीईओ पदासाठी आरबीआयकडे अर्ज करेल. तोपर्यंत दीपक गुप्ता हे हा पदभार सांभाळणार आहेत.

कोटक महिंद्रा बँक ही देशातील तिसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे. या बँकेची स्थापना 1985 मध्ये एनबीएफसी म्हणून झाली. तेव्हापासून उदय कोटक बँकेनं आगेकूच केली. 2003 मध्ये कोटक महिंद्राला व्यावसायिक बँकेचा परवाना मिळाला. तीन दशकांहून अधिक काळात बँकेच्या भांडवलात भरीव वाढ झाली. ज्या गुंतवणूकदारांनी 1985 मध्ये बँकेत 10,000 रुपये गुंतवले होते. त्याचे मुल्य 300 कोटी रुपये असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उदय कोटक यांची या बँकेत 26 टक्के भागीदारी आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, उदय कोटक यांची एकूण संपत्ती सुमारे $13.4 अब्ज आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. राजीनामा दिल्यानंतर, ते बिगर कार्यकारी सदस्य म्हणून बँकेशी जोडलेले असतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube