Ahmednagar Schools : अहमदनगरमध्ये मात्र शिकविण्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर म्हणजेच शाळाबाह्य कामाचा देखील अतिरिक्त बोजा झाला आहे. त्यामध्ये आता शिक्षकांच्या मदतीला आमदार प्राजक्त तनपुरे धावले आहे. त्यांनी शाळाबाह्य कामावरून थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी
विद्यार्थांना घडविणे हे मुख्य काम शिक्षक करत असतात. मात्र शिकविण्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर म्हणजेच शाळाबाह्य कामाचा देखील अतिरिक्त बोजा असल्याने शाळेनं थेट याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले होते. तसेच ही कामे थांबवली गेली नाही. तर येत्या काळात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील शासनाला दिला.
Rajan Patil: मराठी अभिनेत्याच्या प्रश्नाने गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ!
शाळा व्यवस्थापन समितीने पत्रात म्हटले…
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी शाळेतील शिक्षकांना मुलांना शिकवण्याव्यतिरिक्त B.L.O. निवडणूक कामे, निरक्षर सर्वेक्षण, शाळाबाह्य सर्वेक्षण, शालेय पोषण आहार शिजविणे, रेकॉर्ड ठेवणे, सरल पोर्टल तसेच रोजरोजची नवनवीन परिपत्रके, ऑनलाइन त्वरित अहवाल मागविणे यांसारखी बहुतांशी कामे शिक्षकांवर सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश सोडून इतर कामात बहुतांशी वेळ जात आहे. त्यामुळे त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकाची शाळाबाह्य कामे काढून घ्यावेत, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. सदर अर्जाचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा.
NCP Crisis : शरद पवार गटानं हेरलं अजितदादांचं ‘ते’ वाक्य; आता टाकणार पॉवरफुल्ल डाव?
तनपुरे नेमकं काय म्हणाले?
राहुरी तालुक्यातील वळण येथील शाळा व्यवस्थापन समितीद्वारे शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांना लिहिलेले पत्र वाचले. गुरूला देवाचे स्थान देणाऱ्या आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी, आजच्या काळातील शिक्षकांची अगतिकता या पत्रातून व्यक्त झाली. ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला अखंड वाहून घेतलेले असंख्य शिक्षक आहेत. त्यांच्यावरच भविष्यातील पिढी घडविण्याची धुरा आहे. मात्र दुर्दैवाने शासनाने शिक्षकांना हे कार्य सोडून इतर सर्व कामांना जुंपले आहे.
Ahmednagar Police : नगरमधील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा…थेट गृहमंत्र्यांना निवेदन
काळाप्रमाणे शिक्षण पद्धती बदलत चालली आहे. या बदलत्या शिक्षणाला साजेसे असे शिक्षक तयार करणे हे सरकारचे प्राधान्य असेल पाहिजे. मात्र आपली आहे ती कामे उरकण्यासाठीचे कर्मचारी या दृष्टिकोनातून शिक्षकाला दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यामुळे अध्ययन आणि अध्यापन यावर दुरोगमी परिणाम होताना दिसत आहे. मोठ्या शाळांची फी न परवडणाऱ्या गरीब मुलांचे, खासकरून ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य अंधारले आहे. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे.