Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर (Traders)जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी जखमी व्यापारी दीपक रमेश नवलानी (Deepak Navlani) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police)जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (Two Arrested)करण्यात आली आहे. अमर हमीद शेख व रिजवान अमीर सय्यद (रा. पाचलिंब गल्ली, कापडबाजार, अहमदनगर) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फडणवीसांना कोर्टात हजर का व्हावं लागलं? काय आहे प्रकरण?
नवलानी यांच्या फिर्यादीनुसार हे गुन्हे दाखल झाले आहेत. अटक आरोपींसह हमजा शौकतअली शेख व आणखी दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हमजा शौकतअली शेख याने रस्त्यावर गेट बसविल्याने हा वाद झाला होता.
या वादातून नवलानींसह दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेवत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.
या घटनेत जखमी झालेले दीपक नवलानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.