Download App

Ahmednagar : राम शिंदेंसाठी दिल्ली दूरच! ‘ही’ आहेत कारणं

Ahmednagar : लोकसभेचे (Loksabha Election 2024)बिगुल वाजले असून अनेक पक्षांकडून आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यातच नगर दक्षिणमधून भाजपकडून (BJP)पुन्हा एकदा सुजय विखे यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विखे हेच भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात असताना आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) देखील इच्छा व्यक्त केली होती. विखेंना तिकीट डावलले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली. यामध्ये नगर जिल्ह्यातून सुजय विखे (Sujay Vikhe)यांचे नाव जाहीर झाले. आणि पुन्हा एकदा शिंदे यांची दिल्लीवारी हुकली. मात्र शिंदे यांनी आत्तापर्यंत दोनदा लोकसभेसाठी इच्छुकता दर्शवली होती मात्र दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशाच पडली. शिंदे यांची लोकसभेची गणितं नेमकी कुठं चुकली? हेच जाणून घेऊयात…

“मी ठाम, ज्या दिवशी निवडणुकीत उतरेल त्या दिवशी”.. भाजपाचा उल्लेख करत मोरेंचा रोखठोक इशारा

2014 साली पहिली इच्छा व्यक्त केली
भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेले राम शिंदे यांनी सर्वप्रथम 2014 मध्ये लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे बोलले होते. कार्यकर्त्यांची भावना आहे की, आपण लोकसभा लढवावी असे म्हणत शिंदे यांनी पक्षश्रेष्टींकडे लोकसभेसाठी इच्छुकता दर्शवली होती. मात्र भाजपचे दिवंगत नेते दिलीप गांधी हे 2014 साली भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होतो.

तसेच भाजपात असलेले अ‍ॅड. प्रताप ढाकणे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र प्रताप ढाकणे शिंदे यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे पक्षाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान यामुळे भाजपने दिलीप गांधी यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. 2014 साली असलेल्या मोदी लाटेमध्ये गांधी हे निवडून देखील आले. यामुळे राम शिंदे यांची इच्छा ही काही पूर्ण होऊ शकली नाही.

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

2019 मध्ये शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही भूषवले. दरम्यान विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना लोकसभेसाठी आग्रह धरला होता. मात्र त्याचवेळेस काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. भाजपात प्रवेश झालेल्या विखेंना पक्षाकडून लोकसभेचे तिकीट दिले जाणार अशी चर्चा देखील रंगली. दरम्यान पक्षाकडून शिंदे यांना देखील उमेदवारीबाबत विचारण्यात आले, मात्र शिंदे यांनी नकार दिला. यामुळे विखे यांचा मार्ग मोकळा झाला. सुजय विखे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून शिंदे यांच्यावर होती आणि त्यांनी ती पार देखील पाडली. त्यावेळी सुजय विखे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

2024 साठी इच्छुक मात्र पक्षाकडून विखेंना उमेदवारी
2019 ला राम शिंदे हे विधानसभा लढले मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. मात्र पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून नावजलेले व देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे शिंदे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाली. 2024 ला आपण लोकसभा लढवणार असा निर्णय शिंदे यांनी घेतला. त्यानुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरु केली होती.

तसेच 2024 साठी देखील विखे यांची उमेदवारी प्रबळ मानली जात असतानाच शिंदे यांनी जाहीर इच्छा व्यक्त केली. यामुळे एकनिष्ठ असलेले शिंदेंना भाजपकडून संधी मिळणार अशा चर्चा देखील रंगल्या. मात्र भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे यांनाच लोकसभेचे तिकीट जाहीर केले. यामुळे राम शिंदे यांची तिसरी संधी देखील हुकली. फडणवीसांच्या संपर्कात असलेले शिंदे यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सुरु उमटला आहे.

follow us