Download App

Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…

  • Written By: Last Updated:

Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान यावर्षी पावसाचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे देखील पाण्याचं संकट ओढावल्याचं चित्र आहे. मात्र विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले आहे. यामुळे आता परिसरातील महिलांनी पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी थेट मनपा गाठले. यावेळी महिलांनी आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त सचिन बांगर यांची भेट घेवून सदर प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?

महिलांनी घेतला आक्रमक पवित्रा…

या महिलांनी तक्रार केली की, घरामध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने पाणी येत नाही, तो पर्यंत महापालिकेतून जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता. अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे यांनी पाण्याचा प्रश्‍न दोन ते तीन दिवसात मार्गी लावून व खोदून ठेवलेल्या रस्त्याचा प्रश्‍न देखील तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने महिला परतल्या.

बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट; 52 ठार, अनेक जखमी

नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनीत नुकतेच रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी महिनाभरापासून रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ता एकाबाजूने खोदणे अपेक्षित असताना ठेकेदाराने पूर्णत: रस्त्याच खोदून ठेवला आहे. तर रस्ता खोदला जात असताना ठेकेदाराच्या चूकीमुळे नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाइनचे सुमारे दोनशे नळ कनेक्शन तुटले असल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली. यामुळे नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. तर रस्ता पूर्णत: खोदल्याने व त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने टँकरने देखील नागरिकांना पाणी पुरविण्यास अडचण निर्माण झाली आहे.

ठेकेदार नळाचे कनेक्शन दुरुस्त करत नसल्याने व टँकर येण्यास देखील अडचण निर्माण झाल्याने या परिसरात पाणीबाणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराला सूचना करुन हा प्रश्‍न सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने परिसरातील महिलांनी आयुक्तांकडे धाव घेऊन पाण्याचा प्रश्‍न मांडला. तर महिलांनी महापालिकेत पिण्यासाठी पाणी देण्याची आर्त हाक दिली. सोमवार पर्यंत पाण्याचा प्रश्‍न न सोडविल्यास महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

Tags

follow us