Ahmedngar BJP : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात भाजपा व शिवसेनेची युती राहिली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे या युतीला तडे गेले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले व विकासकामांना वेग आला. या युतीच्या माध्यमातून नगरमध्येही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिकेत सत्ता मिळविली होती. भाजप-सेनेची युती भविष्यातही कायम ठेवून यापुढील काळात नगरच्या महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडविण्यात येईल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले. (Ahmedngar BJP get ready for upcoming election )
Ahmednagar News : तीन हजाराची लाच तलाठ्याला पडली महागात; चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
नगर शहर शिवसेनेच्यावतीने भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड.अभय आगरकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महिला आघाडीच्या कला शिंदे, भाजपाचे महेश नामदे आदि उपस्थित होते.
शांत बसा अन्यथा तुमच्या घरी ED येईल; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची भर सभागृहात धमकी
दरम्यान यावेळी उपस्थित असलेले शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, केंद्रात भाजपाची व महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार असल्याने अनेक विकास कामांना वेग प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरही सेना-भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते युतीच्या माध्यमातून एकत्रित काम करत आहेत. आगामी काळात होणार्या निवडणुका या एकत्रितपणे लढविल्या जातील. भाजपाचे नुतन शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी भाजप-सेना युतीमध्ये महत्वाची भुमिका बजावलेली आहे. यापुढील काळातही ते भाजपाचे संघटन मजबूत करण्याबरोबरच सेना-भाजप युतीस पुरक अशी भुमिका घेतील, असा विश्वास व्यक्त केला.