Ahmednagar News : तीन हजाराची लाच तलाठ्याला पडली महागात; चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Ahmednagar News : तीन हजाराची लाच तलाठ्याला पडली महागात; चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमीनीचे दोघा भावांच्या नावे वेगळे खातेउतारे करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणे महिला तलाठ्याला चांगलीच महागात पडली आहे. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरूद्ध लाच स्वीकारल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला ४ वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३ महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अहमदनगरमधील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षाचे वतीने अतिरिक्त सरकारी वकील मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले. ( Ahmednagar News of Talathi taked A Bribe court Punishment of hard labour for four years )

किणी अन् तासवडे टोल नाक्यांवरील वसुली कधी बंद होणार? कराडच्या आमदारांनी PWD मंत्र्यांना घेरलं

नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार पांडुरंग ज्ञानदेव बडे (रा. चिचपूर पांगुळ ता. पाथर्डी) यांच्या वडिलांचे ११ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर वारस म्हणून तक्रारदार बडे व त्यांचे भाऊ यांची नोंद झाली होती. त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरही नोंद लागली होती; मात्र त्यांचे ८ अ हे उतारे वेगवेगळे झाले नव्हते. यासंदर्भात दोन्ही भावांनी २६ ऑगस्ट २०१६ रोजी तलाठी ससाणे यांच्याकडे ८ अ खाते वेगळे करून देण्याची विनंती केली होती.

‘अदानींची गाडी कर्जत-जामखेडला का वळवली नाही?’ राम शिंदेंचा पवारांना खोचक सवाल

दरम्यान या प्रकरणी तलाठी ससाणे हिने लाच म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली. यात तडजोड होऊन तीन हजार रुपये घेण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदार बडे यांनी नगरच्या लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ससाणे हिला तीन हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून पकडले होते.

तपास अधिकारी विष्णु आव्हाड यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला शुभांगी प्रल्हाद ससाणे हिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली. याप्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात याची सुनावणी झाली. ससाणे दोषी आढळून आल्याने न्यायालयाने तिला ४ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube