शांत बसा अन्यथा तुमच्या घरी ED येईल; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची भर सभागृहात धमकी

  • Written By: Published:
शांत बसा अन्यथा तुमच्या घरी ED येईल; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची भर सभागृहात धमकी

Meenakshi Lekhi Controversial Remark : सेवा विधेयकावर बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत जोरदार चर्चा झाली. यादरम्यान भाजपच्या केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळाले आहे. सभागृतील भाषणादरम्यान विरोधक मध्ये-मध्ये बोलत होते. त्यावेळी लेखी यांनी थेट शांत बसा अन्यथा तुमच्या घरी ED येईल असे विधान केले. साक्षी यांचे हे विधान म्हणजे एकप्रकारे धमकी असल्याचे म्हणत विरोधकांनी भाजपविरोधात रान पेटवलं आहे.

किणी अन् तासवडे टोल नाक्यांवरील वसुली कधी बंद होणार? कराडच्या आमदारांनी PWD मंत्र्यांना घेरलं

नेमकं काय घडलं?

भाजप खासदार मीनाक्षी दिल्ली विधेयकाच्या समर्थनार्थ बोलत होत्या. लोकसभेत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, या विधेयकाच्या विरोधातील खरी कहाणी शीशमहलची आहे. जेव्हा काही लोक नैतिकतेबद्दल बोलतात, तेव्हा त्या सर्वांना मला आठवण करून द्यावीशी वाटते की, जे लोक निवडून आलेल्या राज्य सरकारांना 90 वेळा 356 चा वापर करून डिशमिश (बरखास्त) करतात, ते घटनात्मक नैतिकतेबद्दल बोलत असल्याचे काँग्रेसचे नाव न घेत त्या म्हणाल्या.

लेखी यांच्या या वक्तव्यावर विरोधी गटात बसलेल्या काँग्रेस खासदारांनी विरोध सुरू केला. यावर मीनाक्षी लेखी संतापल्या आणि थेट म्हणाल्या की, ‘एक मिनिट शांत राहा, अन्यथा तुमच्या घरी ED येईल असे म्हणत लेखी हसायला लागल्या. त्यांच्या या विधानानंतर आता देशभरातील विरोधकांनी भाजपविरोधात रान पेटवण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात यावरून भाजप विरूद्ध विरोधक असा वाद पाहण्यास मिळू शकतो.

Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप

दरम्यान, “लोकसभेत मीनाक्षी लेखी यांनी दिलेल्या या धमकीमुळे केंद्रीय एजन्सींचा गैरवापर होत असल्याचे अधोरेखित झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. लेखी यांनी लोकसभेत केलेली टिप्पणी ही ‘इशारा’ होता की ‘धमकी’ होती असेही अनेकांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे (TMC) प्रवक्ते साकेत गोखले यांनी लेखी यांनी संसदेत ईडीची टिप्पणी “धक्कादायक” असल्याचे म्हटले आहे. भाजपचे मंत्री आता उघडपणे संसदेत बोलण्यासाठी ईडीचा वापर विरोधकांच्या विरोधात करण्याची धमकी देत ​​आहेत हा सूड आता लपून राहिलेला नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube