Download App

Ahmenagar Crime : कॉफी शॉपच्या भलतच काहीतरी… कपल्स आढळले नको त्या अवस्थेत!

Ahmenagar Crime : अहमदनगर शहरात (Ahmenagar Crime) गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्याबरोबरच अत्याचार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील व्यवसाय शहरात सुरु झाले होते. मात्र आता या कॅफे चालकांवर कोतवाली तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून 4 चालकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे कॅफे चालवणाऱ्या या चालकांकडे कोणताही परवाना नसल्याचे देखील समोर आले आहे.

Kiran Mane : पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘परिवर्तनाच्या लढाईत… ‘

अहमदनगर शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पांर्टमेंट बनवुन तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेवुन जागा उपलब्ध केली जाते. अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी शहरातील कॅफेची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले.

Shirur Loksabha Seat : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये : शिरूरचं जवळपास ठरलंय!

पथकाने नगर शहरातील कॅफे शॉपची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी संबंधित सर्व कॅफे मध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट अश्लील चाळे करण्यासाठी मुला मुलींना करून देण्यात आल्याचे आढळून आले. या संदर्भात कॅफे मालकाला कॅफेच्या परवान्यासाठी विचारपूस केली असता कोणताही परवाना कोणत्याही कॅफे चालकाकडे नसल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा कॅफेवर छापे टाकून आठ जोडप्यांना ताब्यात घेतले होते. तर कॅफे हाऊस चालवणाऱ्या सात जणांविरोधात कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहे.

‘या’ कॅफे शॉपवर कारवाई…

1) श्रीराम चौक, पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्डस कॅफे, 2) कुष्ठधाम रोड येथील बाबाज कॅफे, 3) गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, 4) नगर मनमाड रोडवरील कोहिनुर मॉल समोरील झेड के कॅफे, अहिंचा चौक, बुरुडगांव रोड, इगलप्राईड कॉम्प्लेक्स मधील 5) गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील 6) रिजकिंग कॅफे अशा कॅफे शॉपवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

मुलं-मुली नको त्या अवस्थेत…

नगर शहरातील कॅफे हाऊसच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी छोट्या केबिन बनवून देण्यात आल्या होत्या. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हा नंगानाच सुरु होता. दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात अनेक ठिकाणी धक्कादायक चित्र समोर आले. कॅफे शॉप मध्ये तपासणी केली असताना तरुण मुल मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. कॅफेमध्ये मिळुन आलेल्या तरुण मुला मुलींचे पालकांना बोलावुन त्यांच्या समक्ष तरुणांना समज देवुन पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांच्यावर गुन्हे दाखल

आरोपी 1) महेश मच्छिंद्र तेलोरे, रा. तपोवन रोड, सावेडी अहमदनगर, 2) ऋषीकेश सखाराम निर्मळ रा. झोपडी कॅटीन, अहमदनगर (फरार) (लव्हबर्डस कॅफे) 3) रोहित कुमार साठे, रा. तपोवन रोड सावेडी, अहमदनगर, 4) हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे, रा. तपोवन रोड, सावेडी अहमदनगर (हर्षाज कॅफे), 5) सागर अशोक उदमले रा. हिवरेझरे, ता. नगर (झेड के. कॅफे), 6) रवि रघुनाथ चौरे, रा. गायकेमळा, कल्याण रोड, अहमदनगर (गोल्डरश कॅफे) व 7) अर्जुन ईश्वर कचरे रा. कानडेमळा, सारसनगर, अहमदनगर (रिजकिंग कॅफे) आरोपींविरुध्द कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

follow us

वेब स्टोरीज