Shirur Loksabha Constituency : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये; शिरूरचं जवळपास ठरलंय!
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूर मतदारसंघात (Shirur Loksabha Seat) उमेदवार देणार आणि त्याला निवडून देखील आणणार. असं आव्हान दिले. अजित पवारांनी हे आव्हान दिल्यानंतर हा उमेदवार नेमका कोण असणार? याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; वायकरांनंतर विचारे IT च्या रडारवर
मात्र आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात थेट अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार शिरूरच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अमोल कोल्हे यांना आव्हान दिल्यानंतर, अजित पवार यांनी स्वतः शिरूर मतदार संघाचा भाग असणाऱ्या पुण्यातील हडपसर भागात दौरा केला होता.
तर अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर पार्थ पवार देखील हडपसरमध्ये सक्रिय झाले आहे. आज (9 जानेवारीला) पार्थ त्यांनी हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी घेतल्या. त्यांचा दौरा देखील जाहीर केला. शिरूर मतदार संघामध्ये विजय मिळवायचा असेल तर हडपसर हा भाग महत्त्वाचा मानला जातो.
मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान, या पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल शमी म्हणाला…
तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना मावळ या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर राजकीय व्यासपीठावर ते फारसे दिसले नाही. त्यातच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचे आव्हान दिल्यानंतर कोल्हे यांच्याकडून अजित पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणून दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं.
त्यातच आता पार्थ पवार यांनी शिरूर मतदारसंघातून भेटीगाठी सुरू केल्याने पार्थ पवार हेच शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्या विरोधातील उमेदवार नाहीत ना? या चर्चांणा उधान आलं आहे. तर अनेकांकडून शिरूरसाठी अजित पवार गटाचे उमेदवार असल्याचं बोललं जात आहे.