‘चुनावी जुमला करणाऱ्यांना राम कसा पावणार?’, अमोल कोल्हेंचे भाजपवर टीकास्त्र
अहमदनगर : प्रभू श्रीराम (shriram) यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. राम हे मांसाहारी होते, असं विधाान केल्यानं नवा वाद पेटला आहे. यावर बोलतांना खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले असून यावर अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही. मात्र प्रभू श्रीरामाविषयी कोणी काय बोलावं हे ठराविक लोक ठरवत आहे. राम हा आमच्या हृदयात आहे. प्रभू श्रीराम कोणाची मक्तेदारी नाही. व प्रभू श्रीरामावर कोणी अधिकार गाजवू नये, अशा सडेतोड शब्दात कोल्हेंनी भाजपला (BJP) सुनावलं.
कॉंग्रेस नेते पवन खेरा यांना SC चा झटका! एफआयआर रद्द करण्यास नकार
नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावर काही विकास कामांचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले यावेळी प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते. यावेळी खासदार कोल्हे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की, प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आराध्य दैवत आहे. एकपत्नी, एकवचनी, एक बाणी असं त्याचं वर्णन केलं जातं. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रभू श्रीराम यांच्यासारखं एक वचनी म्हणायचं आणि निवडणूकांमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने तो एक चुनावी जुमला होता, असं म्हणायचं. अशांना प्रभू श्रीराम कसे पावणार? अशा शब्दात खासदार कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
हातकणंगले : शेट्टींच्या साथीने ‘मविआ’ एकवटली, शिंदे-भाजपचे अजूनही एकमेकांच्या पायात-पाय
कोल्हे म्हणाले, देशातील महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नाही. त्यांना त्यांना नाईलाजाने मिळाला या खेळाला अलविदा करावा लागतो. त्या महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर आरोप करतात, त्यांना जर अभय दिले जात असेल तर त्यांना प्रभू श्रीराम कसे पावतील, असंही कोल्हे म्हणाले.
यावेळी त्यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. प्रभू श्रीराम यांनी वनवास स्वीकारला, तो पित्याचं वचन पूर्ण करण्यसााटी. आपल्या गुरूंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार, असंही कोल्हे म्हणाले.
ते म्हणाले, जनता सुज्ञ आहे, कोण्या राजकीय पक्षाने जर प्रभू श्रीरामांवर आपला अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला. तर रामभक्त ते मान्य करणार नाही. राम हा प्रत्येकाच्या हृदयात आहेत, मनात आहेत, असं कोल्हे म्हणाले.