Download App

अहमदनगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; नरेंद्र फिरोदियांकडून उद्घाटन

Narendra Firodiya यांच्या हस्ते अखिल भारतीय खुली बुद्धिबळ क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले

All India Open Chess Tournament inauguration by Narendra Firodiya : अहमदनगर शहरामध्ये भव्य अशा नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ (Chess Tournament) क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodiya) यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटल शेजारी, बडी साजन मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा भरवण्यत आली आहे.

पवार अन् ठाकरेंचा पक्ष प्रादेशिक तर आप ठरला राष्ट्रीय पक्ष; निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय!

या स्पर्धेत देशभरातील सुमारे 550 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यात 270 खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकीत आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (20 जुलै) ला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन आहे. त्यानिमित्त या स्पर्धेने खास लक्ष वेधून घेतले आहे. तर या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण रविवारी 21 जून रोजी गुरूपौर्णिमोच्या दिवशी होणार आहे.

‘दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत’; विशाळगड हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी उद्घाटक आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सचिव यशवंत बापट, अमरावतीच्या स्पर्धकाच्या पालक प्रा. शुभांगी कांबळे यांच्यासह जान्हवी देशमुख छत्रपती संभाजीनगर, ऋतुजा बालपांडे जळगाव, अनुष्का गांधी पुणे, आर्यवीर दर्डा छत्रपती संभाजीनगर हे विद्यार्थी उपस्थित होते.

follow us